घरमहाराष्ट्रWeather Update: राज्यातील उकाडा आणखी वाढणार ; IMD कडून अलर्ट

Weather Update: राज्यातील उकाडा आणखी वाढणार ; IMD कडून अलर्ट

Subscribe

मोचा चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. पाऊस जरी गेला असला तरी वाढत्या उप्णतेने हालहाल होत आहेत. 17 मेपासून राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढणार असून हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आज तापमान साधारण असलं तरी 17 मेपासून मात्र वाढणाऱ्या उष्णतेमुळे हालहाल होण्याची शक्यता आहे, हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. मोचा चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. पाऊस जरी गेला असला तरी वाढत्या उप्णतेने हालहाल होत आहेत. 17 मेपासून राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढणार असून हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. ( Weather Update Heat wave will increase in the state Alert from IMD )

मोचा चक्रीवादळ म्यानमारच्या उत्तर-पश्चिमी किनाऱ्यावर धडकलं असून त्यामुळे मान्सूनच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे. मान्सून उशिरा येऊ शकतो असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

मोचा चक्रीवादळाचा धुमाकूळ

मोचाविषयी सांगांव तर, रविवारी म्यानमारच्या उत्तर प्रश्चिम किनाऱ्यावर धडकलेल्या या वादळामुळे तब्बल 270 किमी प्रती तास इतक्या वेगाने वारे वाहू लागले आणि त्यामुळे किनारपट्टी भागातील अनेक घरांचं नुकसान झालं. तिथे वादळ धुमाकूळ घालत असतानाच इथे महाराष्ट्रात मात्र 17 मेपासून उकाडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही वाढ 2 ते 3 अंशांनी होण्याची शक्यता आहे.

24 तासांत असं असेल हवामान

महाराष्ट्रात मुंबईसह कोकणात उकाडा वाढत असताना राज्याचा उर्वरित भागही याला अपवाद ठरलेला नाही. त्यातच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात या अती उकाड्यामुळेच एखादी अवकाळीची सरही बरसू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश )

देशातील हवामानातही होणार बदल

देशातील हवामानातही पुढील 24 तासांत काही अंशी बदल नोंदवले जाऊ शकतात. ज्यामध्ये पुर्वोत्तर भारतात हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील. केरळ, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील. तर दिल्ली आणि राजस्थानमध्ये धळीचं वादळ येऊ शकतं. उत्तराखंड आणि हिमाचलच्या पर्वतीय भागामध्ये बर्फवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना हवामानाचा अंदाज घेऊन पुढील बेत आखण्याचं आवाहन यंत्रणा करताना दिसत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -