नागरिकांनो काळजी घ्या! येत्या वीकेंडला हवामानात मोठा बदल होणार; हवामान विभागाचा अंदाज

देशातील अनेक भागांतील हवामानात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. काही भागांत थंडी तर, काही ठिकाणी पाऊस पडत आहे. अशातच आता या विकेण्डला हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

winter in mumbai

देशातील अनेक भागांतील हवामानात सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. काही भागांत थंडी तर, काही ठिकाणी पाऊस पडत आहे. अशातच आता या विकेण्डला हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. (weather update imd and skymet south and north india rain alert)

स्कायमेटच्या अंदाजानुसार, उत्तराखंडमध्ये आज पावसाची शक्यता असून, तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

त्याशिवाय, पंजाब, हरयाणा आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमधील चमोली, पिथौरागढ, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी या चार जिल्ह्यांमध्ये तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवरील भागात हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन अलर्टवर आहे.

देशातील हवामान वेगाने बदलत आहे. कडाक्याची थंडी तर कुठे पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर दमट असून, काही ठिकाणी कोरडी थंडी आहे. गुरुवारी तामिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, राजस्थान, पंजाब, हरयाणामध्ये हवामान कोरडे राहिले आणि थंड वारे वाहत होते. दिवसा उन्हामुळे लोकांना थंडीपासून दिलासा मिळाला. मात्र, अजूनही रात्री कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागात २ ते ३ अंशांची तापमानात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईसह कोकण भागात आज कमाल तापामानत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतसह उपनगरात थंडी कमी होत असून उष्णता वाढत आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी अजून गारवा आहे. विदर्भातही नांदेड वगळता बाकी जिल्ह्यांमध्ये किमान आणि कमाल तापमान फार वाढण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा – नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय