Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Weather Update: राज्यासह देशात कुठे पाऊस तर कुठे तापमानाचा पारा 40 अंशाच्या...

Weather Update: राज्यासह देशात कुठे पाऊस तर कुठे तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे

Subscribe

राज्यात सरासरी तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक जिल्ह्यात तपामान हे 40 शीच्या पुढे पोहचले आहे. तर दुसरीकडे मात्र राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात सरासरी तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक जिल्ह्यात तपामान हे 40 शीच्या पुढे पोहचले आहे. तर दुसरीकडे मात्र राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आसाम आणि मेघालयाच्या काही भागात पावासाचा अंदाज आहे. तर जम्मू काश्मीर, लडाख, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशसह सिक्किममध्येदेखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. ( Weather Update In some parts of the country including the state the temperature is above 40 degree Celsius )

डोंगराळ भागात हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. उत्तराखंडच्या अनेक भागांत सध्या वातावरण खराब आहे. केदारनाथ, तुंगनाथ, मध्यमहेश्वर, कार्तिक स्वामीसह उंच डोंगराळ भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरु असून खराब वातावरणामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केदारनाथमध्ये पावसामुळे भाविकांना अनेक अडचणी येत आहेत. तर हिमाचल प्रदेशच्या हवामान विभागाने आज आणि उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: आजपासून ‘नोटबदली’ ; 2000 ची नोट कशी बदलून घ्याल? जाणून घ्या सविस्तर )

दिल्लीसह उत्तर भारतात पावसाची शक्यता

दिल्लीसह उत्तर भारतात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसाच्या गारव्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीकरांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. तर उत्तरप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 26 मेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात पाऊस तर या जिल्ह्यांना कडक उन्हाचा इशारा

- Advertisement -

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होताना दिसून येत आहे. अवकाळी पावासाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा विदर्भात अवकाळी पावासाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पावासाच जोर जास्त असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisment -