घरमहाराष्ट्रWeather Update : हाय गर्मी! फेब्रुवारीत सूर्य ओकणार आग; IMD दिला 'हा' इशारा

Weather Update : हाय गर्मी! फेब्रुवारीत सूर्य ओकणार आग; IMD दिला ‘हा’ इशारा

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात उष्णतेची लाट आली आहे. फेब्रुवारी महिन्यात आल्हाददायक वातावरणाऐवजी अधिक उष्णता जाणवतेय. त्यामुळे फेब्रुवारीत गरमीमुळे अंगाची लाहलाही होत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट आली आहे. यातील बहुतांश भागात कमाल तापमान 37 ते 39 अंशांवर पोहचलं आहे. अशात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस उष्णतेमुळे अधिक त्रासदायक होणार आहे.

समुद्रातील वाऱ्यांच्या वेग मंदावल्याने मुंबईतील कमाल तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना आता तीव्र उन्हाच्या छळा सहन कराव्या लागणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर राज्यांनाही उन्हाच्या तीव्र छळा सहन कराव्या लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता फेब्रुवारीतचं आता हाय गर्मी म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांतून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. यात मुंबईत कालच्या तुलनेत 7.6 अंशांनी तापमान वाढले आहे.

- Advertisement -

देशातील हवामान कसे असेल?

देशभरातील हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास फेब्रुवारीत महिन्यातचं देशात मे महिन्यासारखी उष्णतेची लाट येणार आहे. यात शनिवारी 18 फेब्रुवारी ते बुधवारी 22 फेब्रुवारीदरम्यान राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये तापमान 40 अंशांच्या आसपास जाणार आहे. तर पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड इत्यादी ठिकाणी तापमान 31 ते 36 अंशांच्या आसपास राहू शकते. तर 20 आणि 21 फेब्रुवारीला तापमान सर्वाधिक असू शकतं.

- Advertisement -

त्याचप्रमाणे देशाच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा 6 ते 12 अंशांनी जास्त असू शकतं. त्याचबरोबर यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये उष्णता अधिक असेल, असेही हवामान तज्ज्ञांचं म्हणणंय. हे दोन महिने उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक उष्ण महिने ठरू शकतात.


शिंदे गटाला केंद्रात 4 मंत्रिपदं! 10 दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -