महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; या राज्यांना मात्र हवामान विभागाचा इशारा

विदर्भातील काही जिल्ह्यांत धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र पावसाचा जोर ओसरल्याने काही ठिकाणी पूर ओसरला आहे

weather update rain will subside in maharashtra heavy rainfall imd alert in maharashtra and gujarat

देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. पण काही राज्यांतील लोक अद्यापही चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या 24 तासांत दक्षिण पूर्व राजस्थान , दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश आणि कोकण गोव्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. स्वायमेटच्या अंदाजानुसार, आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, लक्षद्वीप आणि तामिळनाडूत दोन दिवसांपासून मुसळधार पावसासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. दरम्यान पुढील 24 तासांतही गुजरात, दक्षिण पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यात महाराष्ट्रातही पावसाचा जोर ओसरणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र पावसाचा जोर ओसरल्याने काही ठिकाणी पूर ओसरला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातचं पावसाचा जोर कमी झाला असून पूरग्रस्त भागांना दिलासा मिळत आहे.

स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, 20 जुलै रोजी गंगेच्या मैदानी परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे उत्तर पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. जम्मू- काश्मीर, लक्षद्वीप, अंदमान- निकोबार बेट, उत्तर तेलंगणा, विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी राजधानी दिल्लीमध्ये सुमारे एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत शहर आणि उपनगरात दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल.

याशिवाय पुढील 3 दिवसांत पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसासह हलका आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरपूर्व राजस्थानमध्ये पुढील 2 दिवसांत हलका आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे ट्विट करून सांगण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशातील अनेक जिल्हे पुढील तीन ते चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्टवर ठेवण्यात आले आहेत.


उद्धव ठाकरेंनीच मोदींना दिला होता युतीचा प्रस्ताव !