घरदेश-विदेशWeather Update : राज्यातील 'या' ठिकाणी दाट धुक्यासह पावसाची शक्यता

Weather Update : राज्यातील ‘या’ ठिकाणी दाट धुक्यासह पावसाची शक्यता

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लागली होती. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली. जानेवारीच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी ढगाळ हवामान कायम होते. देशातील काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळाली.

पुढील काही दिवसांत दिल्लीतील काही भागात दाट धुक पाहायला मिळणार आहेत. हरियाणा, राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा या वेगवेगळ्या भागात दाट धुके तर, पश्चिम बंगालच्या काही भागात मध्यम धुके पाहायला मिळणार आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, शुक्रवारी वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कमी झाल्यामुळे हवामानावर परिणाम होणार नाही.

- Advertisement -

देशातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे असं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर मैदानी भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान उत्तर-पश्चिम भारतात आवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर प्रदेशात अनेक भागात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली होती. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान वारे पश्चिमेकडे वळतील. त्यामुळे किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होऊन देशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा… Ajit Pawar: लोकप्रतिनिधी असून असं वर्तन..; गृहमंत्र्यांशी चर्चा करणार, अजित पवारांकडून संताप व्यक्त

- Advertisement -

IMD च्या अंदाजानुसार, 4 फेब्रुवारीला डोंगराळ भागात आणि मैदानी भागात गारपीट होण्याची शक्यता असून यानंतर थंडीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. हरियाणा, पंजाबमधील विविध भागात 3 फेब्रुवारीपर्यंत तर दिल्लीत 7 फेब्रुवारीपर्यंत दाट धुके पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

2 फेब्रुवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर पश्चिम उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट झाली. हवामान खात्याने ताज्या अंदाजात सांगितलं आहे की, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशात 4 फेब्रुवारी रोजी हलक्या गारपिटीची शक्यता आहे. रविवारी (4फेब्रुवारी) जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या भागांचे तापमानात वाढ होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -