Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रWeather Update : राज्यात हुडहुडी वाढली; या जिल्ह्यात सर्वाधिक गारठा

Weather Update : राज्यात हुडहुडी वाढली; या जिल्ह्यात सर्वाधिक गारठा

Subscribe

राज्यात दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार सुरूच आहे. काही दिवसापूर्वी राज्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. मात्र त्यानंतर हळूहळू तापमानात घट होत असल्याचे दिसत आहे. 17 ठिकाणांचे तापमान 15 अंशांखाली आले आहे.

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार सुरूच आहे. काही दिवसापूर्वी राज्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. मात्र त्यानंतर हळूहळू तापमानात घट होत असल्याचे दिसत आहे. 17 ठिकाणांचे तापमान 15 अंशांखाली आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानात चांगलीच घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुण्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. (Winter the cold weather has increased in the state.)

हेही वाचा :  Maharashtra Election 2024 : विकास कामांमुळे पुन्हा सत्तेत येणार; महायुतीच्या या नेत्याला विश्वास

- Advertisement -

राज्यात पुढील पाच दिवस किमान कमाल तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच पुण्यातील एनडीए भागातील किमान तापमान 12.02 अंश नोंदविण्यात आले आहे. मुंबईतील तापमाने हे 18 अंशावर आहे. रविवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान 18 अंशाच्या आसपासच राहील, असा अंदाज विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सूर्य मावळल्यानंतर थंडीचा कडाका अधिक तीव्र होत असून शेकोट्या पेटवण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, आणि कोकणातील घाट या भागांमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी धुक्याची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा गारठा जाणवणार नसल्याने तापमान स्थिर असणार आहे.

हेही वाचा :  Politics : भाजपाने घेतलेली उडी म्हणजे…, अदानी प्रकरणी ठाकरे गटाचा थेट हल्लाबोल

- Advertisement -

हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. याशिवाय हरियाणा, दिल्ली आणि उत्तर भारतातही कडाक्याची थंडी जाणवत आहे. महाराष्ट्रातही थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण राहिल्यानंतर आता आकाश थोडे निरभ्र दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात मोठी घसरण होत आहे. येथील तापमान 15 अंशांच्या खाली गेले आहे. दरम्यान, आज राज्यातील किमान तापमानात घट होऊन थंडीत हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -