संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात उत्साहात स्वागत

संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात आगमन होताच सोलापूरकरांनी गुलाबाची फुलं उधळूण स्वागत केले आहे. यावेळी सोलापूर शहरात पालखीचे आगमन होताच सोलापूर शहर पोलीस प्रशासनाकडून परंपरागत पालखीचं स्वागत करण्यात आलं

संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक सध्या आषाढी एकादशीच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वरांपासून ते संत नामदेवापर्यंत सर्वांच्या पालखीचे वारकऱ्यांसह प्रस्थान झाले आहे. नुकतेच शेगावहून निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी आज सोलापूरात दाखल झाली आहे. यावेळी महाराजांच्या पालखाचे सोलापूरकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे.

सोलापूरकरांनी केलं उत्साहात स्वागत
संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात आगमन होताच सोलापूरकरांनी गुलाबाची फुलं उधळूण स्वागत केले आहे. यावेळी सोलापूर शहरात पालखीचे आगमन होताच सोलापूर शहर पोलीस प्रशासनाकडून परंपरागत पालखीचं स्वागत करण्यात आलं.

पालखीचा दोन दिवस मुक्काम
ऊळेहून निघालेली पालखीचा आजचा आणि उद्याचा मुक्काम हा सोलापुरात असणार आहे. यामुळे सोलापूरमधील भाविकांमध्ये आनंदा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारकऱ्यांना वारीत सहभागी होता आले नाही. मात्र आता दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. टाळ, मृदूंगाच्या गजरात वारकरी हरवून गेले आहेत.

 


हेही वाचा :आषाढी वारी २०२२ : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे इंदापुरात पहिले रिंगण पार पडले