नाशिक : दुथडी भरुन वाहणार्या नद्या-नाले, उंचावरुन खळाळत येणारे धबधबे, ओसंडून वाहणारे धरण-बांध आणि विजांच्या कडकडाटात सुरू असलेला मुसळधार पाऊस… जुलै महिन्यात दिसणारे निसर्गाचे हे चित्र यंदा मात्र हरवले आहे. रिमझिम पावसामुळे रानवाटा वरवर हिरव्या दिसत असल्या तरी पाणीटंचाईच्या शक्यतेने बळीराजाची झोप मात्र उडाली आहे.
पाणी हे जीवन आहे. त्याला विनाशापासून वाचवा या म्हणीचे तंतोतंत पालन करण्याची वेळ आता आली आहे. येवला तालुक्यातील उत्तर-पुर्व भागातील विहिरी भर पावसाळ्यातही कोड्याच आहेत. पाऊस नसल्याने ठिकठिकाणी पिकांनी टाकल्या माना टाकल्या आहेत. नदी-नाले, धरणे अद्यापही कोरडेठाक आहे, रिम झिम् पावसावर पेरणी केलेले पिके संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना पिके वाया जाण्याची भीती सतावत आहे. काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पिके कोमजत आहे. पावसाअभावी भयानक चित्र दिसत आहे.
पाऊस थांबल्याने व्यवहारही थांबले, बाजारात शुकशुकाट दिसत आहे. सर्वत्र हेच चित्र असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. याचाच दुष्परिणाम व्यवहारावर होत आहे. रिम् झिंम् पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. आता ही पिके वाढण्याच्या कालावधीतही पावसाने पाठ फिरवलेलीच आहे. शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. याचाच थेट परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे. यावर्षी पावसाचे आगमन सुरुवाती पासूनच जेमतेम असल्याने पावसाच्या आतुरतेत आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरण्या, लागवडी केल्या आहेत. पिकाची भूक वाढल्याने पाण्याअभावी पिकें कोमजू लागली आहे.
येवला तालुक्यातील उत्तर-पुर्व भागात अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. मॉन्सूनचे आगमन एक महिना उशिरा रीम झिम् अल्पशा प्रमाणात पाऊस झाला. मात्र, परिसरात समाधानकारक व जोरदार पाऊस न पडल्याने जलाशये अद्याप कोरडी पडली आहेत. अर्धा ऑगस्ट महिना संपत आला तरी लहान-मोठे तलाव, प्रकल्प, बोअरवेल्स, विहिरी अद्याप कोरड्याठाक आहेत. पावसाळ्यातही पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अशी अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळें शेतकरी पूर्णतः चिंताग्रस्त झाला आहे.
देवळ्यातही शेतकरी बेजार
देेवळा तालुक्यासह मेशी परिसरात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. आतापर्यंत भिजपावसावर ग्रामीण भागातील डोंगरगाव, मेशी, खडकतळे, पिंपळगाव, वासुळ, दहिवड, रणदेवपाढे, खारीफाटा, देवळात तालुक्यात पिकांनी तग धरला आहे. नाले, पाझर तलाव व प्रकल्प कोरडेच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने यंदातरी दमदार पाऊस होईल, अशी शेतकर्यांना आशा होती. मात्र, ऑगस्ट उजाडूनही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांना पाणीटंचाईची चिंता भेडसावू लागली आहे. रिमझिम पावसाने परिसरातील शेतशिवार हिरवेगार झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी तननाशक फवारण्या, कोळपणी, कीटकनाशके फवारुन आंतरमशागतीची कामे केली आहेत.