राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. शिंदे यांना ताप आणि कणकणी आल्याचं बोललं जात आहे. शिंदे यांच्या उपचारासाठी मुंबईहून साताऱ्यातील दरे गावी डॉक्टर्सची एक टीम गेली आहे. सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.
विधानसभा निवडणुकीची धामधूम झाली. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. गुरूवारी एकनाथ शिंदे हे दिल्लीला बैठकीसाठी गेले होते. यानंतर विश्रांतीसाठी शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात आले आहेत. मात्र, ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती.
हेही वाचा : बाबा आढाव कोण आहेत? त्यांचं आत्मक्लेश आंदोलन कशासाठी सुरू आहे?
यातच शनिवारी ( 30 नोव्हेंबर ) एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. शिंदे यांच्या शरीराचे तापमान 105 अंश सेल्सियस असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे दिवसभर निवासस्थानाच्या बाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले आहे. मुंबईतील एक डॉक्टरांची टीम शिंदे यांच्या उपचारासाठी दरे गावात गेली आहे.
केसरकरांना माघारी जावं लागलं….
माजी मंत्री दीपक केसकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी साताऱ्याच्या दरे गावी गेले होते. परंतु, शिंदे यांनी प्रकृती बिघडल्याची माहिती मिळतात ते निवासस्थानाच्या गेटवरून मुंबईकडे माघारी फिरले आहेत.
हेही वाचा : “EVM हॅक करता येऊ शकते, आय एम अल्सो इंजिनियर, आय…”, महादेव जानकरांचा मोठा दावा