Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रPune Crime : दादा, अण्णा अन् ताई पुण्यात चाललंय तरी काय? कुणीही...

Pune Crime : दादा, अण्णा अन् ताई पुण्यात चाललंय तरी काय? कुणीही येतं गाड्या फोडून जाते

Subscribe

पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या जनता वसाहत येथे सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. दिवसाढवळ्या पडणारे खून-दरोडे हे रोजचे झाले आहे. चड्डी गँग, कोयता गँगसारख्या गँगनीतर पुण्याला अड्डा बनवले आहे. यातच आता वाहनांची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांनी तर सामान्यांचं जगणे कठीण केले आहे. त्यामुळे पुण्यातील पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय करतात? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या जनता वसाहत येथे सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रकार समोर आला आहे. हातवर पोट भरणाऱ्या गोरगरीब लोकांच्या वाहनांची तोडफोड समाजकंटकांनी केली आहे. जवळपास 10 ते 15 वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. यात रिक्षा, चारचाकी, मालवाहतूक करणारे टेम्पो, आणि दुचाकींचा समावेश आहे.

हेही वाचा : सिद्धिविनायक मंदिरातील ड्रेस कोडला सदावर्तेंच्या मुलीचा विरोध; राष्ट्रीय महिला आयोगात केली तक्रार

हातात रॉड आणि कोयते घेऊन मुलांचे टोळके येते आणि ते वाहनाचे नुकसान करून जाते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. रस्त्याच्याकडेला लावलेल्या वाहनांचे असे जर नुकसान होत असेल; तर आम्ही वाहनं लावायची कुठे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

गेले अनेक दिवस पुण्यात अशा घटनांचे प्रमाणात वाढत चालले आहे. दहशत निर्माण करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याचे, नागरिकांनी म्हटलं आहे. पोलीस प्रशासन कारवाई करत नाही, त्यांचा कुठल्याही प्रकारे वचक नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे ज्या भागात ही घटना घडली आहे, तो मतदारसंघत राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचा आहे. माधुरीताई मिसाळ, सलग चौथ्यांदा पर्वती मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. महायुती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे. असे असतानाही मिसाळ यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

त्यासह खासदार मुरलीधरअण्णा मोहोळ हे केंद्रात मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अजितदादांनी वाढत्या ‘क्राइम रेट’वरून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बदलण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर पोलिसांनी तोडक-मोडक कारवाई केल्याचं दिसून आले होते. परंतु, गुन्हेगारांनी पुन्हा तोंडवर काढले आहे.
तसेच भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे देखील याच प्रभागात येतात. तर माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे या देखील याच प्रभागाचे प्रतिनिधित्त्व करतात. असे असतानाही जनता दहशतीखाली जगताना दिसत आहे.

याच रस्त्यांवरून नेत्यांचा ताफा येतो आणि जातो; पण वस्तीतल्या नागरिकांना कोणत्या समस्या आहेत, याची साधी विचारणा सुद्धा केली जात नाही. याच भागापासून पोलीस स्टेशनही काही अंतरावर आहे. तरी सुद्धा असा प्रकार घडत असल्यानं सामान्य नागरिकांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणेज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारीच ‘कॉप 24’ या उपक्रमाची घोषणा केली. परंतु, 24 तासांच्या आतच हा सर्व प्रकार घडल्याने पोलीस प्रशासनाचा कारभार उघडा पडला आहे. त्यामुळे खांद्यावर स्टार असणाऱ्या पोलिसांनो आणि 5 स्टार सेवा घेणाऱ्या नेत्यांनो आमच्याकडेही लक्ष द्या, अशी साद पुणेकर घालत आहेत.

हेही वाचा : बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये; नितेश राणेंची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी