भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच पतीच्या हत्येची सुपारी प्रियकर अक्षय जावळकर याला दिल्याचं उघड झालं आहे. आता मोहिनी वाघ सुद्धा पतीवर गंभीर आरोप केले आहेत.
पतीचे सुद्धा अनैतिक संबंध होते, असा आरोप मोहिनी वाघने पोलीस तपासात केला आहे. तसेच, पती शारीरिक छळ करत होता, असंही मोहिनी वाघनं म्हटलं आहे.
सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी मोहिनी वाघला बुधवारी ( ता. 25 ) अटक केली आहे. गुरुवारी ( ता. 26 ) तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मोहिनीसह सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा : संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर दमानियांनी पुकारला एल्गार; म्हणाल्या, “धनंजय मुंडेंना…”
“पती सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते. माझाही तो शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. हा सर्व त्रास असह्य होता,” असा खुलासा मोहिनीने पोलीस चौकशीत केला आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, तपासात खुनातील आरोपी अतिश जाधव याच्या धाराशिव येथील घरातून त्याचे रक्तानं माखलेले कपडे हस्तगत करण्यात आले आहेत. सतीश यांचा खून करण्यासाठी अक्षय जावळकरला पाच लाख रूपये कसे दिले? याबाबतचा तपासासाठी अक्षयची सर्व बँक खाती तपासण्यात आली आहेत. आरोपींकडून मिळत असलेल्या माहितीच्या आधारावर तपास केला जात आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ बड्या नेत्याचं नावावर शिक्कामोर्तब, पण…