पुणे : मनात राग धरून हत्या केल्याचे प्रकार याआधी आपण पाहिले आहेत. पण, शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्यानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करून नंतर तिचा खून करण्याची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. अवघ्या 100 रूपयांत दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याला ही सुपारी देण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
परंतु, शाळेची बदनामी होऊ नये, म्हणून हा प्रकार दडपण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच, विद्यार्थिनीला मानसिक शाळा प्रशासनाकडून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. याबाबत मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक आणि शिक्षिकेवर गुन्हा पुणे जिल्ह्यातील दौंड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : फरार असताना वाल्मिक कराडने ‘ते’ महत्त्वाचं काम केले; दानवेंचा मोठा दावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी दौंड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीच्या वर्गात शिकत आहे. तिच्या वर्गातील एका विद्यार्थ्यानं पालकांची खोटी स्वाक्षरी ( सही ) केल्याची विद्यार्थिनीनं वर्गशिक्षिकेला दिली. याचाच राग विद्यार्थ्याच्या मनात होता. हाच राग मनात धरून संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या मित्रानं इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला पीडित विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करून नंतर तिला मारून टाकण्यासाठी 100 रूपयांची सुपारी दिली.
पण, सुपारी दिलेल्या विद्यार्थ्याने याची माहिती विद्यार्थिनीला दिली. नंतर पीडित विद्यार्थिनीने ही बाब घरी सांगितली. याबाबत पीडितेच्या वडिलांनी वर्गशिक्षक, मुख्याध्यपकांकडे विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही. यामुळे पीडितेच्या वडिलांनी दौंड पोलिसांनी धाव घेतली. नंतर महिला सहायक पोलीस निरीक्षकांना चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.
पोलीस चौकशीदरम्यान मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनीवर आरोप केले. विद्यार्थिनीने 100 रूपये दिले होते. ती विद्यार्थ्यांची बदनामी करत असल्याचा लेखी जबाब तीन विद्यार्थ्यांसह एका वर्गशिक्षकाकडून घेतले होते. त्याशिवाय मुख्याध्यपकांनी विद्यार्थिनीला दुसऱ्या वर्गात टाका, असे आदेश दिले होते.
हे गंभीर प्रकरण लपवून शाळेची बदनामी टाळण्यासाठी मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी कट रचून दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान झाले आहे, असं फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दौंड पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा : एका माजी नगरसेविकाच्या प्रवेशावरून आदित्य ठाकरे अन् शिंदेंमध्ये जुंपली