Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रVijay Shivtare : पुणे जिल्हा नियोजन समितीतून शिंदेसेना बेदखल? विजय शिवतारे म्हणाले,...

Vijay Shivtare : पुणे जिल्हा नियोजन समितीतून शिंदेसेना बेदखल? विजय शिवतारे म्हणाले, तसा प्रकार अजितदादा…

Subscribe

पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीत ( डीपीडीसी ) शिंदेंच्या शिवसेनेला स्थान देण्यात आले नाही. राज्य सरकारनं दौंडचे भाजपचे आमदार राहुल कूल आणि मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) आमदार सुनील शेळके यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. पुणे जिल्ह्यातील सासवडचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना ‘डीपीडीसी’त स्थान न दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यातच विजय शिवतारे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विजय शिवतारे म्हणाले, “बातमी काहीतरी चुकीची वाटत आहे. मी देखील पालकमंत्री होतो. सर्वच आमदार, खासदार हे ‘डीपीडीसी’चे सदस्य असतात. स्मॉल कमिटीत दोन भाग आहेत. राहुल कूल आणि सुनील शेळके यांना काही नियोजनासाठी स्मॉल कमिटीत घेतले असेल. तो भाग वेगळा आहे.”

हेही वाचा : ‘डीपीडीसी’ बैठकीत मुंडेंसोबत बाचाबाची झाली? सुरेश धस म्हणाले, आमचे भांडण…

“डीपीडीसीच्या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. डीपीओने डीपीडीसीचे सगळी कागदपत्रे दोन दिवसांपूर्वी पाठवली आहेत. त्यामुळे कुठेतरी गैरसमज होतोय, असं मला वाटते. तसा प्रकार अजिबात अजितदादांनी केला नाही. त्यामुळे शिवसेनेत किंवा राष्ट्रवादीत कसलीही ठिणगी पडली नाही, असे मला वाटते,” असं शिवतारे यांनी स्पष्ट केले.

नेमका विषय काय होता?

पालकमंत्रिपदावरून शिंदे गटातील नाराजी दूर झाली नसताना राज्य सरकारने मंगळवारी जिल्हा नियोजन समित्यांवरील राजकीय नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बुधवारी लगेचच पुणे आणि बीड जिल्ह्यातील नामनिर्देशित सदस्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार पुणे जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके तसेच भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 आमदार आहेत. यापैकी पुरंदरमधून शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे एकमेव आमदार निवडून आले आहेत.

मात्र, शिवतारे यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीवर स्थान देण्यात आलेले नाही. शिवतारे आणि अजित पवार यांच्यात फारसे राजकीय सख्य नाही. त्यामुळे विजय शिवतारे यांना डावलण्यात आल्याची चर्चा होती. परंतु, ही चर्चा शिवतारे यांनी फेटाळून लावली आहे.

हेही वाचा : 20 वर्षांत किती पैसा गोळा केला? मोदी सरकारच्या काळातील आकडा किती? ‘ईडी’नं दिला सगळा हिशेब