घरCORONA UPDATEपश्चिम रेल्वेच्या डॉक्टरांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या तपासणीसाठी तयार केला 'इनट्यूबेशन बॉक्स'

पश्चिम रेल्वेच्या डॉक्टरांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या तपासणीसाठी तयार केला ‘इनट्यूबेशन बॉक्स’

Subscribe

आता आयसोलेशन कोच निर्मिती बरोबर पश्चिम रेल्वेच्या डॉक्टरांनी कोरोनाग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यासाठी चक्क इंट्यूबेशन बॉक्स तयार केला आहेत.

भारतीय रेल्वे कोरोनाविरोधाच्या लढाईत मोठ्या प्रमाण योगदान देत आहेत. आता आयसोलेशन कोच निर्मिती बरोबर पश्चिम रेल्वेच्या डॉक्टरांनी कोरोनाग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यासाठी चक्क इनट्यूबेशन बॉक्स तयार केला आहेत. भारतीय रेल्वेत सर्वप्रथम पश्चिम रेल्वेने  इनट्यूबेशन बॉक्स तयार केेले असून इतिहासात आपले नाव नोंदविले आहेत. या बॉक्समुळे डॉक्टरांना सुरक्षा मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या या प्रयोगामुळे भारतीय रेल्वेत सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी इनट्यूबेशन बॉक्स तयार केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचार करताना डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यांनी मिळून अत्याधुनिक इनट्यूबेशन बॉक्स तयार केला आहे. हा बॉक्स कोरोना रुग्णाच्या डोक्याकडील भाग या बॉक्समध्ये टाकण्यात येतो. हा इनट्यूबेशन बॉक्स वक्रकार आकाराचा असून या बॉक्सला दोन्ही बाजूने मोठे छिद्र आहेत. या छिद्रातून डॉक्टर आणि नर्सेस कोरोना रुग्णाची सुरक्षित तपासणी करता येते. त्यामुळे कोरोना वार्डमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णाच्या थेट संबंध या बॉक्समुळे टाळता येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून अशाप्रकारची सामग्री तयार करण्याची सूचना रेल्वेला आल्या होत्या. त्या अनुषंगाने लोअर परळ येथे इनट्यूबेशनचे पाच बॉक्स तयार केले गेले आहेत. या इनट्यूबेशन बॉक्सचा आकार ३० बाय २४ बाय २० असा आहे. हा बॉक्स पारदर्शी असून २ ते ३ किलोग्रॅमचा आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहेत.


डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी हा इनट्यूबेशन बॉक्स तयार केला आहेत. हा बॉक्स लोअर परळ वर्कशॉपचे उपमुख्य यांत्रिक अभियंता अरुण कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाने बेसिक ट्रेनिंग सेंटर, लोअर परेलमध्ये तयार करण्यात आला आहे. जगजीवन राम रुग्णालयात याचा वापर केला जाणार आहे.
– रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -