घरमहाराष्ट्रपश्चिम रेल्वे मार्गावर वाढणार आणखी आठ वातानुकूलित लोकल फेऱ्या; उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

पश्चिम रेल्वे मार्गावर वाढणार आणखी आठ वातानुकूलित लोकल फेऱ्या; उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

Subscribe

दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत असल्याने पुन्हा ८ लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यानुसार, सोमवार ८ ऑगस्टपासून वाढवलेल्या फेऱ्यांमध्ये चार फेऱ्या अप मार्गावर आणि चार फेऱ्या डाऊन मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवार, ८ ऑगस्टपासून वातानुकूलित लोकलच्या (AC Mumbai Local) आणखी आठ फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. तिकिट शुल्कात कपात केल्यामुळे वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढला होता. वाढता प्रतिसाद पाहून एसी लोकल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Western Railway to introduce 8 more AC local trains from Aug 8)

५ मे रोजी एसी लोकलच्या तिकिट शुल्कात पन्नास टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. तेव्हापासून एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. परिणामी मे महिन्यातच १२ लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली. त्यानंतर पुन्हा २० जून रोजीही एसी लोकलच्या ८ फेऱ्या वाढवण्यात आल्या. दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत असल्याने पुन्हा ८ लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यानुसार, सोमवार ८ ऑगस्टपासून वाढवलेल्या फेऱ्यांमध्ये चार फेऱ्या अप मार्गावर आणि चार फेऱ्या डाऊन मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता एसी लोकल फेऱ्यांची संख्या ४८ झाली आहे.

- Advertisement -

आठ लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक

अप मार्ग

विरार – चर्चगेट – सकाळी ७.३० (जलद लोकल)
बोरिवली ते चर्चगेट – सकाळी ९.४८ (जलद लोकल)
मालाड ते चर्चगेट – सायंकाळी ५.५२ (जलद लोकल)
भाईंदर ते चर्चगेट – सायंकाळी ७.५२ (धीमी लोकल)

- Advertisement -

डाऊन मार्ग

चर्चगेट ते विरार – सकाळी ५.५८ (जलद लोकल)
चर्चगेट ते बोरिवली – सकाळी ९ (जलद लोकल)
चर्चगेट ते मालाड – सकाळी १०.४७ (जलद लोकल)
चर्चगेट ते भाईंदर – सायंकाळी ६.३५ (जलद लोकल)

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -