घर महाराष्ट्र काय गं विचित्राबाई..., ठाकरे गटाचं चित्रा वाघ यांना 'त्या' वक्तव्यावरून चोख...

काय गं विचित्राबाई…, ठाकरे गटाचं चित्रा वाघ यांना ‘त्या’ वक्तव्यावरून चोख प्रत्युत्तर

Subscribe

काय ग विचित्राबाई, किती वेळा रंग बदलणार तुझ्यात लपलेला सरडा! असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं आहे. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता त्यांनी एक ट्वीट करत अनेक प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांच्या अनेक भूमिका कशा दुटप्पी आहेत, हे सांगितलं आहे.

काय ग विचित्राबाई, किती वेळा रंग बदलणार तुझ्यात लपलेला सरडा! असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं आहे. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आता त्यांनी एक ट्वीट करत अनेक प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांच्या अनेक भूमिका कशा दुटप्पी आहेत, हे सांगितलं आहे. (What a vichitrabai Uddhav Thackeray group s deputy leader and spokesperson Sanjana Ghadi has again criticized BJP leader Chitra Wagh)

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ ?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना टरबुज्या असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, उद्धव ठाकरे यांच्यावर विदूषकासारखी वेळ आली आहे. त्या पुढे म्हणाल्या की आपण उद्धव ठाकरे यांना जोकरचा ड्रेस पाठवणार आहोत. कारण उद्धव ठाकरे हे आता करमणुकीपुरता राहीले आहेत. तसंच, भाजप सरकारने कलम 370 हटवून दाखवलं हा पुरूषार्थ आहे. उद्धव ठाकरे आपला पुरूषार्थ काय तर कोविड काळात भ्रष्टाचार, पत्राचाळ घोटाळा यात आहे, अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली होती.

- Advertisement -

संजना घाडींचे चित्रा वाघ यांना खोचक सवाल

संजना घाडी यांनी आता अनके मुद्दे उपस्थित करत चित्रा वाघ यांची एकाच प्रकरणावर बदलत गेलेली भूमिका अधोरेखित केली आहे. तसं ट्वीटही त्यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये घाडी यांनी संजय राठोड, धनंजय मुडे, गुलाबराव पाटील या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांवरील वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवर बोट ठेवत प्रश्न उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

इतकंच नाही तर, सायन बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ यांनी आवाज उचलला होता पण मणिपूर संदर्भात त्या शांत का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना विदूषक म्हटलं होतं यावर त्यांनी किरीट सोमय्या, नितेश राणे, आशिष शेलार, अतुल भातखळकर, राम कदम यांना विदुषकाच्या वेशभूषेत सोडा, असं म्हटलं आहे. यावर आता चित्रा वाघ काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(हेही वाचा: उगीच मला ट्रोल करू नका; कंत्राटी पदभरतीवरील आरोपाचे घोंगडे अजित पवारांनी फेकले )

- Advertisment -