Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी संजय राऊत यांच्यावरील तपास अहवालात काय निष्कर्ष आहेत?

संजय राऊत यांच्यावरील तपास अहवालात काय निष्कर्ष आहेत?

शिवसेना खासदार संजय राऊत मागील ७ वर्षांपासून छळ आणि मानसिक खच्चिकरण करत आहेत.

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका महिलेने संजय राऊत यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची हायकोर्टाने दखल घेतली आहे. महिलेच्या तक्रारीवर लक्ष घालण्याचे आदेश हायकोर्टाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तसेच या बाबतचा अहवालही २४ जूनला कोर्टात सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. महिलेने संजय राऊत यांच्यावर २०१८ पासून आरोप केले आहेत. संजय राऊत धाक दाखवत आहेत तसेच जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. याबाबत मुंबई पोलिांनी सहकार्य केलं नसल्याचं महिलेनं न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण

महिलेनं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मागे माणसे लावली असून हेरगिरी करत आहेत. जिवेमारण्याचा प्रयत्न करतायत, धाक दाखवत असल्याचा आरोप उच्चशिक्षित महिलेनं केला आहे. तशी तक्रार हायकोर्टात केली असून कोर्टाने आता या तक्रारीची दखल घेतली आहे. न्यायालयानं महिलेच्या याचिकेवरुन मुंबई पोलिसांना आदेश दिले आहेत. या प्रकरणात लक्ष घालून २४ जूनला सखोल अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान महिलेनं मागील ७ वर्षांपासून संजय राऊत त्रास देत असल्याचे याचिकेत म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्यावर आरोप कोणते

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत मागील ७ वर्षांपासून छळ आणि मानसिक खच्चिकरण करत आहेत. माझ्या मागावर लोकं ठेऊन पाळत ठेवली जात आहे. हेरगिरी करणं, जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या असल्याचा आरोप या मानसोपचार तज्ञा महिलाने केला आहे. तक्रारदार महिला गेल्या अनेक वर्षांपासून जाच सहन करत आहे. महिलेनं मागील ७ वर्ष छळवणुकीविषयी मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली होती. परंतु दोन्ही कार्यालयांकडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याचे महिलेनं सांगितले आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी संजय राऊतांचा एकदाही जबाब नोंदवला नाही. राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागितली असता आयोगानेही तक्रार नोंदवून घेतली नाही. तसेच बीकेसी परिमंडळ ८ च्या पोलीस आयुक्तांनीही तक्रारीची दखळ घेतली नाही. यामुळे उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली असलयाचे महिलेने म्हटलं आहे.

राऊतांवर तक्रार केल्यामुळे सूड

- Advertisement -

संबंधित ३६ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली होती. या महिलेला बनावट पदवी प्रकरणात अटक केली होती. सध्या महिलेला जामीनावर सोडण्यात आलं आहे. संजय राऊत यांच्यावर आरोप आणि तक्रार केल्यामुळे मला बनावट पदवी प्रकरणात गोवण्यात आलं असल्याचा आरोप महिलेकडून करण्यात येत आहे.

संजय राऊत यांचं मौन

संजय राऊत यांच्याविरोधात मार्च महिन्यात न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये सर्व आरोप फेटाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परंतु सध्या महिलेनं केलेल्या तक्रारीवर खासदार संजय राऊत यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

- Advertisement -