घरमहाराष्ट्रनाशिककांदा भाववाढीचे नेमके कारण काय?

कांदा भाववाढीचे नेमके कारण काय?

Subscribe

राज्यात कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मात्र, या भाववाढीमागे कांद्याची टंचाई फक्त हेच कारण ठरु शकते का? हा देखील प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.

राज्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या भावाने किलोमागे शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा खरेदीसाठी जादा पैसे आकारावे लागत आहेत. कांद्याचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकार विदेशातून कांदा आयात करण्याचा विचार करत आहे. दरम्यान, राज्यात कांद्याची टंचाई निर्माण व्हावी यासाठी कांद्याचा साठा लपवून ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांकडे देखील राज्य सरकारचे बारीक लक्ष्य आहे. सोमवारी नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या लासलगाव आणि येवला या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याने छापा टाकला.


हेही वाचा – कांदा साठेबाजीवर प्रशासनाचा वॉच; व्यापाऱ्यांची तपासणी

- Advertisement -

 

…म्हणून टाकला प्राप्तिकर खात्याने छापा

कांदा व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी तसेच साठेबाजीच्या संशयावरुन प्राप्तिकर खात्याने लासलगावच्या ४ तर येवल्याच्या एका बड्या व्यापाऱ्याच्या कार्यालये आणि कांदा साठवणुकीच्या खळ्यांवर छापा टाकला. या छाप्यामुळे कांदे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी कांदा व्यापाऱ्यांचे गेल्या पाच वर्षांचे तपशीलाचे कागदपत्रे मागितले आणि कांद्याची साठवणूक तपासली.

- Advertisement -

व्यापाऱ्यांची लिलाव बंदची हाक

प्राप्तिकर विभागाने धाड टाकल्यामुळे कांदे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी या विरुद्ध लिलाव बंदची हाक दिली. केंद्र सरकार हेतू पुरस्सर व्यापाऱ्यांवर लक्ष करत आहे. कांदा व्यापाऱ्यांवर अशा धाडी पडत असतील तर कांदा कसा खरेदी करायाचा आणि कसा साठवायचा? असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -