घरमहाराष्ट्रमी काय हे निवडणुकीत कळेल - नारायण राणे

मी काय हे निवडणुकीत कळेल – नारायण राणे

Subscribe

मी कुठे आहे हे आताच काही ठरवू नका. ना मी नांदेडचा आहे ना नागपूरचा. मी कोकणातला असून २०१९ च्या निवडणुकीत मी काय आहे, हे सर्वांना कळेल, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

पुण्यात एका समारंभासाठी आलेल्या राणे यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली. ‘ठाकरे कोण राज की उद्धव?’ या प्रश्नावर त्यांनी ‘ते दोघेही नाहीत’, असे उत्तर दिले. काँग्रेस की भाजपा, अशी विचारणा झाल्यावर ‘दोन्ही सारखेच’ असे ते म्हणाले.

- Advertisement -

दरवेळी शिवसेनेकडून करण्यात येणार्‍या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मला घडवले. त्यांच्यामुळे मी आहे, असे म्हणणार्‍या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे धाडस दाखवावे. ना वीट, ना स्टील, ना सिमेंट अन् चालले राम मंदिर बांधायला! या शब्दांत त्यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले.

कोकणातील माणसे आळशी असे चित्र निर्माण करून लक्ष विचलित केले जाते. कोकणी माणूस प्रचंड उत्साही असून आपण स्वत: युरोपात मासे निर्यात करतो, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -