Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र समितीच्या निर्णयावर शरद पवारांचं मत काय? प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं

समितीच्या निर्णयावर शरद पवारांचं मत काय? प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

शरद पवार यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. काही दिवसांचा वेळ मला द्या, मी समितीच्या निर्णयावर विचार करुन सांगतो असं पवार यांनी सांगितल्याच पटेल म्हणाले.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला. उपाध्यक्ष प्रफुल्ल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत झालेला निर्णय प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर सांगितला, शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं. असा ठराव आम्ही आज मंजूर केल्याचं ते म्हणाले. तसचं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत असून तेच पक्षाचे अध्यक्ष राहावेत, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तसचं, या प्रस्तावावर शरद पवार यांचं मत काय यावरही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. ( What is NCP Sharad Pawar s opinion on the committee s decision Praful Patel said it clearly )

पवारांचा राजीनामा फेटाळला, राष्ट्रवादीच्या ठरावात नेमकं काय?

राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवारसाहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती करण्यात येत आहे, असं या समितीच्या ठरावात म्हटलं आहे.

पवारांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला- पटेल 

- Advertisement -

शरद पवार यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. काही दिवसांचा वेळ मला द्या, मी समितीच्या निर्णयावर विचार करुन सांगतो असं पवार यांनी सांगितल्याचं पटेल म्हणाले. आम्ही प्रस्ताव शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. लोकांच्या भावनांचा आदर केला आहे, असं प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले. तसचं यावर शरद पवार यांच्याकडून जे काही उत्तर येईल, ते तुम्हाला लगेच कळवलं जाईल, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.

( हेही वाचा: Modi-Shah : ‘असत्यमेव जयते’ हे ज्यांचे आदर्श… काँग्रेसची मोदी-शाहांवर जोरदार टीका )

- Advertisement -

2 मेच्या दिवशी शरद पवार यांनी राजीनामा दिला होता. त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी पक्षाच्या अध्यक्ष पदावर दुसऱ्याने राहावं अशी सूचना केली होती. समिती देखील गठित केली होती. मी पक्षाचा उपाध्यक्ष असल्यामुळे मला त्याची जबाबदारी दिली होती.

सर्वांनी मिळून शरद पवार यांनी विनंती की देशाला तुमची गरज आहे. नाव आणि आधारस्तंभ तुम्हीच आहात. देशात सन्मानित नेता फक्त शरद पवार आहेत. परवा पंजाबला आम्बही गेलो होते त्यावेळी पंजाबचे शेतकरी भेटले ते म्हणत होते पवारांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं काम विसरु शकत नाही, असं प्रफुल्ल पटेले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

 

- Advertisment -