घरमहाराष्ट्र'त्या' वेळी लोकेशन काय? सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची 'दिशा'भूल!

‘त्या’ वेळी लोकेशन काय? सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची ‘दिशा’भूल!

Subscribe

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाने जवळपास अडीच वर्षांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. याप्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी होणार आहे. या सर्व प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न आहे. तथापि, आपण त्यावेळी तिथे नव्हतोच, असे सांगताना त्यांनी केलेला खुलासा आणखीन संभ्रमात टाकणारा आहे.

गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरण उपस्थित केले. त्यापाठोपाठ भाजपा आमदार नितेश राणे, अमित साटम, मनीषा चौधरी, देवयानी फरांदे आदींनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरत चौकशीची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या फेरचौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे, आदल्या दिवशीच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बिहार पोलिसांचा हवाला देत, याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर लोकसभेत बोलताना संशय व्यक्त केला होता. मात्र नंतर लोकसभेच्या कामकाजातून म्हणणे वगळण्यात आले.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी, 32 वर्षांच्या तरुणाला सरकार घाबरले आहे, अशी प्रतिक्रिया गुरुवारी दिली होती. तर, शुक्रवारी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना, दिशा सालियनचा मृत्यू झाला, त्यावेळी कुठे होतो याचा खुलासा केला आहे. तुमचे लोकेशन ट्रेस करा, सीसीटीव्ही गायब झाले आहे, असे विरोधकांकडून सांगितले जात आहे, तुमच्यावर आरोप केले जात आहेत, यामधील नेमके तथ्य काय आहे ते महाराष्ट्राला कळू द्या, असे एबीपीच्या प्रतिनिधींनी विचारले. ‘एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण सगळे, तुम्ही बघितले असेल, माझे आजोबा त्यादिवशी गेले होते. ही सत्य गोष्ट आहे. सर्व हॉस्पिटलला होते. त्यावेळी तुमचा मेसेजही होता की आम्ही हॉस्पिटलच्या खाली पोहोचलो आहोत…’ असे आदित्य ठाकरे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

तथापि, दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाली होती, तर 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूत गळफास घेतल्याच्या स्थितीत वांद्रेस्थित त्याच्या फ्लॅटवर आढळला होता. तर, दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांचे आजोबा आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये 15 जून 2020 रोजी निधन झाले होते. याबाबतचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याच दिवशी सकाळी 10.41 वाजता केले होते. तर, आदित्य ठाकरे यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जून 2020 रोजी रात्री 10.16 वाजता ट्वीट करून माधव पाटणकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

शिवाय, दिशाचा मृत्यू 8 आणि 9 जूनच्या मध्यरात्री झाला होता. त्यामुळे एकूणच, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आदित्य ठाकरे यांनी असा खुलासा करून ‘दिशा’भूल करण्याचा प्रयत्न केला आहे का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -