घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंसोबत किती आमदार आल्यास सरकार स्थापन होईल, काय आहे पक्षांतर बंदी...

एकनाथ शिंदेंसोबत किती आमदार आल्यास सरकार स्थापन होईल, काय आहे पक्षांतर बंदी कायदा?

Subscribe

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक शिवसेना आमदारांसह गुजरातमधील सुरतमध्ये हॉटेल मेरेडियनमध्ये तळ ठोकला आहे. यामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षांतर्गत बंडाळी मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून सूत्र हलवण्यात येत आहेत. दरम्यान, पक्षांतर बंदी कायद्यामुळे हा पेच कसा सुटनार हे पहाने महत्वाचे ठरणार आहे.

असा आहे पक्षांतर बंदी कायदा –

- Advertisement -

देशाला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 1967 पर्यंत पक्षांत बंदी कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे पक्षांतर करण्याला काहीच मर्यादा राहिल्या नव्हत्या. त्यामुळे पक्षांत बंदी कायदा करण्यात आला. या कायद्या नुसार लोकसभा किंवा विधिमंडळामधील सदस्य पक्षादेशाचे पालन न केल्यास ते अपात्र ठरू शकतात. त्याचबरोबर अन्य पक्षात प्रवेश किंवा पक्षादेश डावलून मतदान केल्यासही सदस्य अपात्र ठरतो. याशिवाय अन्य पक्षांना मदत किंवा त्यांच्या बैठकांना उपस्थित राहिल्यासही सदस्य अपात्र ठरू शकतो.

तर सदस्यत्व कायम –

- Advertisement -

पक्षांतर बंदीच्या कायद्यामध्ये एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते वैध मानले जात होते. मात्र, 2003 मध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनुसार एकूण सदस्यसंख्येच्या दोनतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास सदस्यत्व कायम राहू शकते.

एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत काय होऊ शकते ?

बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 22 आमदार असल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या घडीला विधानभेत शिवसेनेचे 55 आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना 37 आमदारांना पाठिशी घेऊन पक्षांतर करावे लागेल. मात्र, हा आकडा मोठा असल्याने एवढ्या आमदारांचे त्यांना पाठबळ आहे का हे येणारा काळ सांगेल. अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याचा बडगा त्यांच्यावर असेल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -