ही काय धर्मशाळा आहे का? कोणीही कसेही वागायला?, अजित पवार सभागृहात कडाडले

Maharashtra Assembly Budget 2023 |

remove inconvenience candidates during police recruitment Ajit Pawar demand

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – सभागृहाचे कामकाज सुरु असताना अनेक सत्ताधारी सदस्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गराडा घालून आपल्या अर्जावर शेरे व सह्या मारून घेण्याचे काम सुरु होते. काही काळ असाच प्रकार सुरु राहताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला, त्यांनी थेट आम्ही काही बोलत नाही म्हणजे काहीही चालेल का? ही काय धर्मशाळा आहे का ? कोणी ही कसेही वागायला? असा हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेते अजित पवारांचा रौद्ररूप पाहताच सर्व सत्ताधारी सदस्य आपापल्या जागेवर गेले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री बोलल्यानंतर विधानसभा सभागृहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भोवती जमून सत्ताधारी सदस्यांनी गराडा करुन आपल्या अर्जांवर शेरे व सह्या करून घेण्याला सुरुवात केली. हा प्रकार काही काळ असाच सुरु राहताच विरोधी पक्षनेते चांगलेच संतापले. त्यांनी आम्ही काही बोलत नाही म्हणजे काहीही चालेल का? ही काय धर्मशाळा आहे का? कोणी ही कसेही वागायला? असा हल्लाबोल केला. यानंतर अध्यक्षांनी सत्ताधारी सदस्यांना समज दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे रुद्रारुप बघून पुन्हा सभागृह सुरळीत सुरू झाले.

दरम्यान, राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेवर उत्तर देत आहेत. उत्तराच्या सुरुवातीपासूनच त्यांनी हसत खेळत वातावरणात विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. अजित पवार, जयंत पाटलांसह संपूर्ण महाविकास आघाडीविरोधात त्यांनी मिश्किल टीप्पणी केली. पहाटेचा शपथविधीसह घटनाबाह्य विरोधी पक्षनेते, चहापान, जाहिरातीवरील खर्चांवर त्यांनी भाष्य केलं.