घरताज्या घडामोडीज्यांचा आत्मा मेलाय त्यांच्याकडून निष्ठेची काय अपेक्षा ठेवणार? संजय राऊतांचा बंडखोरांवर पुन्हा...

ज्यांचा आत्मा मेलाय त्यांच्याकडून निष्ठेची काय अपेक्षा ठेवणार? संजय राऊतांचा बंडखोरांवर पुन्हा हल्ला

Subscribe

या बंडखोरीत काहींना तेथे डांबून ठेवलंय. त्यांचा आत्मा परत येईल आणि ते पुन्हा आम्हाला सामिल होतील, असा विश्वास आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ज्यांचा आत्मा मेलाय त्यांच्याकडून निष्ठेची काय अपेक्षा ठेवणार, असा घणाघात संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी केला आहे. या बंडखोरीत काहींना तेथे डांबून ठेवलंय. त्यांचा आत्मा परत येईल आणि ते पुन्हा आम्हाला सामिल होतील, असा विश्वास आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज माध्यमांशी चर्चा केली. (What kind of loyalty can be expected from those whose souls have died? Sanjay Raut attacks rebels mla again)

हेही वाचा – एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंशी केली दोनदा फोनवर चर्चा, राजकीय चर्चांना उधाण

- Advertisement -

‘मुंबई बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर’, असं ट्विट काल एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांचा मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत संबंध आहे. ज्यांच्याकडे ३०० किलो आरडीएक्स आहे, ज्यांच्यामुळे ४० सैनिकांची हत्या झाली याविषयी बोला. बाकी दाऊदविषयी आपण नंतर बोलू.

हेही वाचा बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयात आज लढाई, दोन्ही बाजूंनी हायप्रोफाईल वकिलांची फौज तैनात

- Advertisement -

संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्ही शिवसेनेसोबत अनेक वर्ष काम केलं आहे. ते आमचे नेते आहेत. उद्धव ठाकरे यांचं आजरपण आणि कोविड याचा गैरफायदा घेऊन तुम्ही बंड करत असाल तर ते अमानुष आहे. ते कोणालाही न पटणारं नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

ईडी तुम्हाला मतं देणार नाहीत 

केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, ईडी तुम्हाला मतं देणार नाहीत. तुम्हाला मते जनता देते. त्यामुळे ईडीला घाबरू नका, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – राजस्थानमधील सरकार पाडण्याच्या कटात सचिन पायलटही होते सहभागी, मुख्यमंत्र्यांचा निशाणा

हिंदुत्वासाठी इतिहास साक्ष

भाजप मेहबुबासोबत सत्ता स्थापू शकते मग आम्ही तर महाराष्ट्रातील मातीसोबत एकत्र आहोत. हिंदुत्वाशी कोणी प्रतारणा केली? सध्या काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू आहे, पाकिस्तानची घुसखोरी सुरू आहे, हे काय हिंदुत्वाचं लक्षण आहे?
गुवाहाटीतील हॉटेलमधील दरवाजे उघडा, वर्तमान पत्रे वाचा, बधिरतेमध्ये राहू नका, असाही सल्ला संजय राऊतांनी दिला. गेल्या ४०-५० वर्षांत हिंदुत्वासाठी कोण मेलंय याला इतिहास साक्ष आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – बंडखोर आमदारांच्या मतदार संघात गृह खात्याकडून हायअलर्ट जारी

मोकळ्या हवेत श्वास घ्या

बंडखोर आमदारांना आम्ही थांबवलं नाही. त्यांनी मुंबईत यावं. इकडे येऊन मोकळ्या हवेत श्वास घ्यावा, असंही राऊत म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदेचा गट आता मनसेमध्ये जाऊ शकतो अशी चर्चा आहे. त्यावर विचारलं असता ते म्हणाले की, ते एमआयएमध्येही जाऊ शकतात, ते समाजवादीमध्ये जाऊ शकतात, ते अशा कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला, ज्याने त्यांचा पाळणा हलवला, अशा पक्षाचा द्वेष करून ते जाणार असतील तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. मनसेला अशापद्धतीने मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ही ऐतिहासिक गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही रोड स्टेट आणि फ्लोअर टेस्टसाठी तयार आहोत, असंही राऊत म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -