Homeमहाराष्ट्रMaharashtra EVM Issue : महाराष्ट्रातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची आकडेवारी जुळली; निवडणूक आयोगाचे म्हणणे...

Maharashtra EVM Issue : महाराष्ट्रातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची आकडेवारी जुळली; निवडणूक आयोगाचे म्हणणे काय

Subscribe

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सातत्याने ईव्हीएमवरून गदारोळ सुरू आहे. मशीनमध्ये गडबड असल्याचा मोठा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. या सगळ्या गोंधळादरम्यानच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट स्लिप या दोघांची आकडेवारी जुळल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सातत्याने ईव्हीएमवरून गदारोळ सुरू आहे. मशीनमध्ये गडबड असल्याचा मोठा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. या सगळ्या गोंधळादरम्यानच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट स्लिप या दोघांची आकडेवारी जुळल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. (what maharashtra election commission said on evm and vvpat)

महाराष्ट्र निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदार संघातील कोणतीही पाच मतदान केंद्रे निवडली जातात. ईव्हीएमची आकडेवारी आणि व्हीव्हीपॅट स्लीपची मोजणी केली जाते. हे बंधनकारक आहे. त्यानुसार, 23 नोव्हेंबरलाच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी पर्यवेक्षक तसेच उमेदवाराच्या प्रतिनिधींसमोर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील निवडण्यात आलेल्या 5 बूथपैकी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमची पडताळणी करण्यात आली. आणि ती तंतोतंत जुळली.

- Advertisement -

हेही वाचा – Rahul Narwekar : सर्वांना सभागृहाची शिस्त पाळावी लागेल! नार्वेकरांनी सत्ताधारी, विरोधकांचे कान टोचले

यासंदर्भात निवडणूक आयोगाने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार, सर्व 288 पैकी प्रत्येक मतदारसंघातील कुठल्याही 5 बूथ वरील 1440 VVPAT मशीन मधील चिठ्ठ्या आणि कंट्रोल युनिटमधील मते टॅली केली असता त्यांचा तंतोतंत हिशोब जुळून आला आहे. या सगळ्या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आल्याचेही राज्या निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेता आदित्य ठाकरे म्हणाले की, हे ईव्हीएमचे सरकार असल्याने आम्ही विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष – शरद पवार यांनी देखील ईव्हीएमवर शंका व्यक्त केली. आम्ही ईव्हीएम संदर्भात काही आकडे गोळा केले आहेत. लोकांनी मतदान केले आहे, पण त्याचे समोर आलेले निकाल वेगळेच आहेत.

सत्ताधारी भाजप, सेनेने ही जनतेची दिशाभूल करण्याची विरोधकांची खेळी असल्याची टाकी केली आहे. आम्ही पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा आदर करतो, पण ते खोटे पसरवत आहेत, असा आरोपही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

हेही वाच – Hindu Under Attack : मंदिराची निर्मिती भारतात; पण बांगलादेशी सैनिकांनी देशात घुसत थांबवले बांधकाम?

विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 पैकी 230 जागांवर महायुतीने विजय मिळवत महाविकास आघाडीला भुईसपाट केले.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -