Homeमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रChhagan Bhujbal : छगन भुजबळ अमित शहांसोबत मांडीला मांडी लावून बसले, दोघांमध्ये...

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अमित शहांसोबत मांडीला मांडी लावून बसले, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

Subscribe

छगन भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नाशिक येथील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसून आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. या चर्चेबाबत आता छगन भुजबळ यांनी खुलासा केला आहे.

मुंबई : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुर्नाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते एकाच मंचावर एकत्र आले होते. यानंतर आता छगन भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नाशिक येथील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसून आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. या चर्चेबाबत आता छगन भुजबळ यांनी खुलासा केला आहे. (What was discussed between Chhagan Bhujbal and Amit Shah at the event in Nashik)

माध्यमांशी संवाद साधताना अमित शहांसोबत झालेल्या चर्चेबाबत छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, अमित शहा यांचं मोठेपण आहे की, मी कार्यक्रमात लांब बसलेला असताना त्यांनी मला जवळ बोलवून शेजारच्या खुर्चीवर बसवले. आमच्यात बोलणं काय झालं, तर तुम्ही कसे आहात. सर्व चांगलं चाललं आहे. तीन वर्षांपूर्वी तुम्ही लोक माझ्याकडे आलात, तेव्हा मला विश्वास नव्हता की, असं काही होऊ शकतं. पण खरोखर तुम्ही लोकांनी किमया करून दाखवली. यावेळी मात्र राजकारणावर काहीच चर्चा झाली नाही. अमित शहा यांनी दिल्लीत भेटायला बोलवलं आहे का? असा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की, दिल्ली देशाची राजधानी आहे. त्यामुळे आपण कधीपण जाऊ शकतो, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता अमित शहा आणि छगन भुजबळ यांच्या भेटीची चर्चा होताना दिसत आहे. तसेच छगन भुजबळे हे दिल्लीत अमित शहांच्या भेटीला जाणार का? हेही पाहावे लागेल.

हेही वाचा – Chhagan Bhujbal : पवारांसोबतच्या लिखापढीनंतर भुजबळांच्या अमित शहांशी गुजगोष्टी

अमित शहांकडून भुजबळांचे कौतुक

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मालेगावच्या अजंग येथे उभारलेल्या 538 एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला भेट दिली. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र व अगरबत्ती कारखान्याचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. यावेळी अमित शहा या कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाल्यावर त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे पाहिले आणि त्यांना बोलवून आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. यानंतर सहकार परिषदेच्या माध्यमातून अमित शाह यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी भुजबळांचे कौतुक केले. छगन भुजबळ हे एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Ashish Shelar : तुम्ही अमित शहांच्या पाठीवर वळ उठवणार आहात का? शेलारांचा ठाकरेंना सवाल