ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन? बहुमत सिद्ध करण्यासाठी शिंदे गटाचा कसा असणार प्रवास

राज्यातील सत्तासंघर्ष दिवसागणिक गडद होत चालला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. परंतु उद्या बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार आज अॅक्शन मोडवर आली आहे. दुसरीकडे शिंदे गट आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या मुंबईला येणार आहेत. परंतु शिंदेगटाचा हा प्रवास कसा असणार आहे, हे पाहणं मह्त्त्वाचं आहे.

एकनाथ शिंदे आणि आमदारांनी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर त्याच रात्री बंडखोरी केली. त्यानंतर ते पालघरच्या मार्गाने गुजरातमध्ये दाखल झाले. गुजरातमध्ये दाखल झाल्यानंतर ते सुरतच्या ली मॅरेडियन हॉटेलमध्ये बसमधून दाखल झाले होते. त्यानंतर आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यातूनच बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये आणि आमदारांचे नातेवाईकही त्यांना भेटायला येऊ शकतात. यासाठी सर्व बंडखोर आमदारांना आसाममध्ये हलवण्यात आलं.

आसामच्या गुवाहाटी येथील हॉटेमध्ये बंडखोरांनी मध्यरात्रीची वेळ घेतली. सुरत एअरपोर्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर ते तीन विशेष विमानांनी गुहावाटी येथील रेडिसन्स ब्लू या हॉटेलमध्ये दाखल झाले. या हॉटेमध्ये पोहोचल्यानंतर भाजपकडून एकप्रकारे त्यांना रसद पोहोचवण्यात येत होती. हॉटेलच्या बाहेरदेखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. तसेच आसाममध्ये एकीकडे पुराचं संकट असताना दुसरीकडे महाराष्ट्राचं राजकीय संकट येथे घोंघावत होतं. त्यामुळे येथील स्थानिक नागरिक आणि तृणमूल काँग्रेसच्या पक्षाकडून हॉटेलच्या बाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून थेट मुंबईतील राजभवनात भगतसिंह कोश्यारी यांची काल(मंगळवार) भेट घेतली. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्याची मागणी त्यांनी राज्यपालांना केली. त्यानंतर राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत वेळ दिली असून ठाकरे सरकार उद्या आपलं बहुमत सिद्ध करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गट आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी गुहावाटीतून थेट गोव्याला रवाना झाले आहेत. तीन विशेष विमानांनी ते गुहावाटीतून गोव्यातील ताज या हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. परंतु उद्या सकाळी सात वाजेच्या सुमारास एका विशेष विमानाने सगळे आमदार मुंबईत दाखल होतील. मुंबईतदेखील ताज हॉटेलमध्ये ते पोहोचतील. येथेच भाजप आमदारांनाही ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर एकत्र भाजप आणि बंडखोर आमदार विधानभवनाकडे रवाना होणार आहेत.


हेही वाचा : तीन नामांतरावर शिवसेना ठाम, कॅबिनेटची बैठक वादळी ठरण्याची शक्यता