Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राजकारणात जी काही भूमिका घेईन ती छातीठोकपणे; पंकजा मुंडे यांनी केले स्पष्ट

राजकारणात जी काही भूमिका घेईन ती छातीठोकपणे; पंकजा मुंडे यांनी केले स्पष्ट

Subscribe

बीड : स्व. गोपीनाथ मुंडे यांचा आज नववा स्मृतिदिन आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावर  (Gopinath Gad) आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपा सोडणार अशा सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, राजकारणात जी काही भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. (Whatever role he takes in politics, Explained by Pankaja Munde)

पंकजा मुंडे म्हणाल्या की, भूमिका समाजहिताच्या घ्यायच्या असतात. एखाद्या वेळेस सगळ्यांना आवडणाऱ्या भूमिका घेणारा व्यक्ती आमदारकी, खासदारकी किंवा मंत्रीपद मिळवू शकतो, पण तो कधी नेता होऊ शकत नाही. मला हे सगळं मिळालं नाही. त्यामुळे मला परळीतून पराभव स्वीकारावा लागला. मला असं काही मिळालं नाही, तर मग मी काय करायला पाहिजे? असा प्रश्न उपस्थितांना विचारत त्यांनी सांगितले की, मी माझी खरी भूमिका निभावली पाहिजे. मला जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर अशीच तुम्हा सगळ्यांना याठिकाणी बोलवेल आणि तुमच्या समोर बिनधास्त भूमिका घेईल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याएवढे खांदे मला अजून तरी मिळाले नाहीत. मात्र माझ्या खांद्याची रूंदी इतकी आहे की, अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी विसावू देणार नाही. यापुढे मी जी काही भूमिका घेईल ती छातीठोकपणे. आजपर्यंत ज्या भूमिका मी जाहीर मांडल्या त्यांच्याशी प्रामाणिक आहे. अनेक जण निवडणूका हरले, पण त्यांना संधी दिली गेली. गेल्या चार वर्षात दोन डझन अमदार-खासदार झालेत, त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोकं चर्चा करणार. ही चर्चा मी ओढवलेली नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती मला सापडलाय
पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, माझा नेता अमित शाह आहे. मी त्यांची भेट घेणार आहे. मी त्यांची वेळ मागितली आहे. त्यांच्याशी मी मनमोकळेपणाने बोलणार आहे, त्यांना विचारणार आहे. कारण माझे वडील आता जीवंत नाही आहेत. परंतु माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती मला सापडला आहे. मी त्यांच्याशी बोलणार आहे, असे वक्तव्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझे हिचिंतक खूप आहेत. सगळेच आहेत आणि सगळ्याच पक्षात आहेत. आतापर्यंत जे बोलले त्यांचे मी आभार मानते. मी रडगाणे गाणारी नाही. त्यामुळे मला आज तुमच्या सर्वांसमोर स्पष्टपणे सांगायचं की, तुमचं प्रेम, दिशा आणि दशा हेच माझं राजकारण ठरणार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

 

 

- Advertisment -