Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नाशिकमध्ये काय सुरू , काय बंद ?

नाशिकमध्ये काय सुरू , काय बंद ?

Related Story

- Advertisement -

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिकमध्ये ‘ब्रेक द चेन’ मोहीम राबविण्यास सुरूवात करण्यात आली असून त्याअंतर्गत सोमवार (दि. ५) पासून रात्री ८ वाजेपासून ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा पुर्णपणे बंद राहणार आहे अशी माहीती जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भुजबळ म्हणाले, राज्यासह नाशिक जिल्हयात कोरोना रूग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. याकरीता आरोग्य सुविधा वाढविण्यात येत आहेत मात्र तरीही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही निर्बंध लागू केले असून नाशिक जिल्हयातही हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानूसार आता ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठा या बंदच राहणार आहेत. त्याचप्रमाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्बंधांचे कठोर पालन करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. शासन निर्णयानंतर नाशिककरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे मात्र नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम बाळगु नये, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, खाजगी आस्थापना या बंद राहणार असल्याचा पुनरूच्चार भुजबळ यांनी केला. अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणार्‍या किराणा, भाजी बाजार देखील रात्री ८ नंतर बंद करण्यात येतील मात्र मेडीकल, हॉस्पिटल व आरोग्य व्यवस्थेशी संबधित सर्व कामकाज मात्र चोवीस तास सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

उपहारगृहे व बार वाईन शॉप बंद
उपहारगृहे, बार तसेच वाईन शॉप पुर्णपणे बंद राहतील. पण उपहारगृहे एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर तेथे राहणार्‍या अभ्यांगतासाठी सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीस प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. रस्त्याच्या कडेला असणार्‍या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. मात्र नियमांचे पालन होत नसल्यास हे व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात येतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हे सुरू राहणार
हॉस्पिटल, मेडीकल, डायग्नोस्टिक सेंटर, दवाखाने, किराणा दुकानं, भाजी बाजार, डेअरी, बेकरी, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा, सार्वजनिक वाहतुक सेवा, शेतीविषयक कामे, हॉटेल व खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पार्सल सुविधा, विमा कार्यालये, ट्रान्सपोर्ट, शेतीविषयक कामे, ई कॉमर्स सेवा, वृत्तपत्रे, औद्योगिक कंपन्या, बांधकाम क्षेत्र.

- Advertisement -

हे राहणार बंद
वाईन शॉप, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, चौपाटी, खेळाची मैदाने, कापड दुकाने, ज्वेलर्स, मॉल, चित्रपटगृह, सलून, ब्युटीपार्लर, जिम, खाजगी क्लासेस, ग्रंथालय, अभ्यासिका, वित्तीय सेवा सोडून इतर खाजगी कार्यालये बंद, सर्व दुकाने.

- Advertisement -