WhatsApp Chatbot Launch : मत मागताना वाकलेले लोक नंतर ताठ होतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

महापालिका कौतूकासाठी काम करत नाही कर्तव्य म्हणून काम करते. स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

WhatsApp Chatbot Launch cm uddhav thackeray slams opposition
WhatsApp Chatbot Launch : मत मागताना वाकलेले लोक नंतर ताट होतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिसीद्वारे हजेरी लावली होती. महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. महानगरपालिकेमध्ये काय काम चालते याची माहिती आता नागरिकांना सहज मिळणार आहे. तसेच मत मागताना जी लोक वाकतात ती नंतर मत मिळाल्यावर ताठ होतात. तर ओळखही दाखवत नाहीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण केल्यावर संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांची अनेक कामे असतात. परंतु ती कऱणं बाजूला राहिले साधं उत्तर मिळत नाही. अशामुळे नागरिकांच्या आयुष्यात वैफल्य येते. मत मागताना जी लोक वाकलेली असतात ती लोक मत मिळाल्यानंतर ताठ होतात. ओळखही दाखवत नाहीत. अशावेळी हा जो कार्यक्रम सुरु करतो आहोत तो एक क्रांतीकारक कार्यक्रम आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई देशातील नंबर एकची महानगरपालिका आहे. ज्यांनी जनतेला साधी साधी काम महानगरपालिकेत होत असतात. जेव्हापासून मोबाईल आला आहे त्यानंतर व्हॉट्सअॅप सुरु झाले आहे. पण व्हॉट्सअॅपचे उपयोग आणि दुरुपयोग याचा फरक जाणून घेऊ, हे तंत्रज्ञान जे पुढे जात आहे. त्याचा जर उपयोग सर्वसामान्यांना होत नसले तर त्याचा उपयोग काढीचा नाही. सर्वसामान्यांच्या आयुष्यात सहजता आणण्यासाठी महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. हे फार कौतुकाचे काम असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सुरुवात या वर्षाची चांगली झाली आहे. पहिल्यांदा आपण ५०० चौ फुटापर्यंत घरांचा मालमत्ता कर रद्द करुन वर्षाची सुरुवातच दणक्यात केली आहे. कोस्टल रोडचे मावळाचे लाईव्ह केले होते. काही लोक काम न करताच बोलत असतात. त्यांच्यासाठी लाईव्ह करण्यात आले. आपला कारभार अत्यंत उघडा आहे. यामध्ये लपवाछपवी नाही.

काम न करणारी अनेक लोकं – मुख्यमंत्री

महापालिका म्हणजे नेमक काय? या महापालिकेचे नेमक काम काय आहे? कोविडच्या काळात कोणताही अनुभव नसताना महापालिकेनं जे काही काम केलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पाऊल उचलली. २० दिवसांत कोविड सेंटर उभारले आहे. फक्त सेटर उभारले नाही तर ते आताही चालवत आहोत. कोविड काळात महापालिकेचे काम कौतूकास्पद आहे. महापालिका कौतूकासाठी काम करत नाही कर्तव्य म्हणून काम करते. स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री आहे. त्यांची साथ असल्याने मुंबईचे कौतूक जागतिकस्तरावर होत आहे. मी त्यांना नम्रपणे नमस्कार करतो. पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते देण्याचे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.


हेही वाचा : कोणाच्या बोलण्यावरून शिवसेना धोरण ठरवत नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला