घरमहाराष्ट्र'व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकतो', व्हॉट्सअॅप फ्रेंडचा महिलेवर बलात्कार

‘व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकतो’, व्हॉट्सअॅप फ्रेंडचा महिलेवर बलात्कार

Subscribe

व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये अनोळखी व्यक्तीने तुम्हाला पर्सनल चॅटवर बोलण्याचा प्रयत्न केला, तर एकदा नक्की विचार करा. कारण पिंपरी-चिंचवड मधील हिंजवडी परिसरात एका व्हॉट्सअॅप ग्रुपमधून ओळख झालेल्या विवाहित व्यक्तीने विवाहित महिलेचा अश्लील व्हिडिओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित ३९ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिसात तक्रार नोंदवली असून ती सात महिन्याची गरोदर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईनाथ शेट्टी (वय – ४४, रा-थेरगाव, मूळचा अंधेरी, मुंबई) आणि पीडित ३९ वर्षीय महिला हे दोघेही श्वान प्रेमी असून त्यांचा व्हाट्सऍप ग्रुप आहे. दोघांची ओळख ही व्हॉट्सअॅपमुळे झाली. ते पर्सनल चॅटिंगवर बोलू लागले त्यांनी एकमेकांना कधीच पाहिले नव्हते. चॅटिंग वाढत गेले, आरोपीने मला तुमच्याशी भेटून बोलायचे आहे, असं म्हणून एका हॉटलेवर पीडित महिलेला बोलावले. तिथे त्याने तिच्याशी जबरदस्ती करत बलात्कार केला याचे व्हिडिओ चित्रण करत ते पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी महिलेला दिली.

- Advertisement -

व्हिडिओचा धाक दाखवून अनेकदा बलात्कार

त्यानंतर पीडित महिलेला पर्याय नव्हता आरोपी साईनाथकडे अश्लील व्हिडिओ होते. आरोपी बोलवेल त्या ठिकाणी महिलेला जावे लागत होते. हा प्रकार गेल्या एक ते दीड वर्षांपासून सुरू आहे. पीडित महिलेचा विवाह झालेला असून तिला १५ आणि ८ वर्षाची मुले आहेत. त्यामुळे महिला घाबरत होती. पीडित महिला गृहिणी आहे, तर आरोपी हा छोटा मोठा व्यवसायिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व महिलेला असह्य झाले होते.

ती आरोपी पासून सात महिन्याची गरोदर असून तो तिला शिवीगाळ आणि मारहाण करून बलात्कार करतो. गरोदर झाल्यानंतर महिलेला लग्नाचे अमिश आरोपीने दाखवले. दरम्यान पीडित महिलेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी नराधम आरोपीने दिली होती. त्यामुळे अखेर पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार नोंदवली आहे. आरोपी हा फरार असून त्याचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर या करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -