व्हाट्स अँप ग्रुपची वाढणार सदस्य मर्यादा, फाईल्स पाठवण्याची क्षमताही वाढणार

नाशिक : व्हॉट्सअॅप युझर्ससाठी खूशखबर आहे. व्हॉट्सअॅप लवकरच नवीन फीचर्स घेऊन येणार असून, त्यात ग्रुपवर आता ५१२ जणांना सहभागी करून घेता येणार आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपची सध्याची मर्यादा २५६ सदस्यांची आहे. ती आता दुप्पट होणार आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपवरून २ जीबी आकाराची फाईलही पाठवता येऊ शकणार आहे. व्हॉट्सअॅपची ही नवीन फीचर्स आयओएस आणि अँड्रॉईड फोनवर उपलब्ध असतील. येत्या काही आठवड्यांत नवीन फीचर्स लाँच केली जाणार आहेत.