घरक्राइमWhat's App Msg : मेसेज टाकून मागितली मदत, सापडला मृतदेह; धुळ्यातील घटनेने...

What’s App Msg : मेसेज टाकून मागितली मदत, सापडला मृतदेह; धुळ्यातील घटनेने खळबळ

Subscribe

 

धुळेः माझ्या मागे गुंड लागले आहेत. मला मदत करा, असा मदतीचा मेसेज एकाने What’s App ग्रुपवर टाकला. त्यानंतर मेसेज टाकणाऱ्याचा मृतदेहच सापडला. धुळेमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

शिरपूर येथील सबस्टेशनला प्रवीण विजय गवते सिनीअर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांनीच What’s App ग्रुपवर हा मेसेज टाकला होता. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांनी हा मेसेज टाकला होता. माझ्या मागे ४ ते ५ गुंड  लागले आहेत. ते सर्व अनोळखी आहेत. मला काहीच सुचत नाही. माझ्या सोबत ३ लाख रूपये आहेत. मी कसा तरी स्व:ताला वाचवण्याचा प्रयत्न करत असून मला मदत करा, असे त्यांनी मेसेजमध्ये लिहिले होते. हा मेसेज बघून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांचा संपर्क झाला नाही. अखेर दोन तासांनी गिधाडी तापी नदी पुलावर गवते यांची बाईक आढळून आली. तेथेच नदीपात्रात गवते यांचा मृतदेह सापडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचाःवटपौर्णिमेच्या दिवशी विवाहितेची आत्महत्या

- Advertisement -

पोलिसांनी गवते यांचा मृतदेह शिंदखेडा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाःनिफाडमध्ये ‘लव्ह जिहाद’; उगावमधील १८ वर्षीय मुलीचे अपहरण; सोमय्यांनी घेतली एसपींची भेट

धुळ्यात अपघातांची श्रृखंला

धुळे-सोलापूर महामार्गावर आमदाराच्या मामांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना फेब्रुवारी २०२३ मध्ये घडली होती. मणिक रायजादे असं मृत व्यक्तीचं नाव असून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. मणिक रायजादे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे मामा आहेत. संदीप क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विद्यमान आमदार आहेत. ते, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास प्रवास करत होते. यावेळी त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. गढी नजीक त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांची ब्रेजा कार चार ते पाच वेळा उलटली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.ळे जिल्ह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. जिल्ह्यात ३ लाख ५८ हजार ३९६ नोंदणीकृत वाहने आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ६१४ अपघात होऊन तब्बल ३४० जणांचा मृत्यू झाला. तर, ६७८ जण जखमी झाले. धुळे जिल्हास्तरीय समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीत ही धक्कादायक माहिती समोर आली. यावेळी महामार्गांवरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

निकालाच्या आदल्याच दिवशी खून

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील कैलासनगरात पाच मजली इमारतीच्या गच्चीवरून ढकलून दिल्याने १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञांत दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. विद्या हनुमान काळे (१६, मूळ रा. सारोळा, ता. पाथरी, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ३ जून रोजी ही घटना घडली. दहावीच्या निकालाआधीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -