Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र निवडणुका जवळ आल्या की जातीय दंगली घडवल्या जातात; विश्वजीत कदमांचा सरकारवर गंभीर...

निवडणुका जवळ आल्या की जातीय दंगली घडवल्या जातात; विश्वजीत कदमांचा सरकारवर गंभीर आरोप

Subscribe

काँग्रेसकडून सांगली जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा सुरू होती. या पदयात्रेची सांगली शहरात आज सांगता करण्यात आली. 9 सप्टेंबरपासून माजी कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखील काँग्रेसची ही पदयात्रा सुरू होती.

काँग्रेसकडून सांगली जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा सुरू होती. या पदयात्रेची सांगली शहरात आज सांगता करण्यात आली. 9 सप्टेंबरपासून माजी कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखील काँग्रेसची ही पदयात्रा सुरू होती. यावेळी जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधण्यात आला. यावेळी विश्वजीत कदम यांनी साताऱ्यात पुसेसावळी येथे झालेल्या घटनेसंदर्भात बोलताना, हल्ली निवडणुका जवळ आल्या की सत्ताधारी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून दंगली करण्याचं कट कारस्थान करतात, असं म्हणत गंभीर आरोप केला आहे. (When elections are near there are communal riots Vishwajit Kadam s serious accusation against the Central government )

नेमकं काय म्हणाले विश्वजीत ? 

अलीकडील काळात देशात निवडणुका जवळ आल्या की सत्ताधारी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून दंगली करण्याचा कट कारस्थान करतात, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी भाजप सरकारवर केला.

सतेज पाटलांचं महागाईवरून टीकास्त्र

- Advertisement -

कोल्हापूरमधील जनसंवाद यात्रेत सतेज पाटील यांनी भाजप व युकी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. गॅसचे दर दोनशे रुपये कमी केल्याची टिमकी वाजवणाऱ्यांनी गेल्या काही वर्षात चारशे रुपयांना असणारा गॅस हा अकराशे रुपयांवर नेऊन ठेवला आहे. येत्या काळात निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकार आणखी दर कमी करणार, असं सतेज पाटील म्हणाले.

(हेही वाचा: मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भात आदित्य ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले… )

संविधानाची तोडफोड – चंद्रकांत हांडोरे

- Advertisement -

सध्या देशात संविधानाची तोडफोड होत आहे. ती थांबावी आणि लोकशाही जीवंत राहावी यासाठी काँग्रेसने समविचारी पक्षांना एकत्रित घेत इंडिया गटाची स्थापन केली. याचा धसका भाजप आणि केंद्र सरकारने घेतल्यानं आता पुन्हा एकदा भारताचा नारा दिला आहे, अशी टीका माजी मंत्री तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हांडोरे यांनी केली आहे.

- Advertisment -