घरमहाराष्ट्रखासदार नवनीत राणा यांचा जन्मदिवस नेमका कधी? तीन तारखा आल्या समोर!

खासदार नवनीत राणा यांचा जन्मदिवस नेमका कधी? तीन तारखा आल्या समोर!

Subscribe

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कायम आक्रमक असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या ‘खासदारकी’चा वाद न्यायालयापर्यंत गेला आहे. पण आता त्यांच्या जन्मतारखेबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. तीन तारखा समोर आल्याने त्यांचा जन्मदिवस कोणता हा प्रश्न निर्माण झाला आहे.

खासदार नवनीत राणा यांचे शालेय शिक्षण कुर्ला येथील कार्तिका हायस्कूलमध्ये झाले आहे. त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर त्यांची जन्मतारीख 6 एप्रिल 1985 आहे. त्यांचे पती रवी राणा यांनी देखील काल केलेल्या ट्वीटवर त्यांची जन्मतारीख हीच सांगितली आहे. तर, अन्य एका कागदपत्रांवर त्यांची जन्मतारीख 15 एप्रिल 1985 अशी नोंदवण्यात आली आहे. माहितीचा विश्वासार्ह स्रोत समजल्या जाणाऱ्या विकिपिडीयावर मात्र त्यांची जन्मतारीख 3 जानेवारी 1986 दाखविली आहे.

- Advertisement -

सार्वजनिक जनादेशाचा अपमान करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केले. उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून विचलित झाल्याने, शिवसेनेमध्ये हिंदुत्वाची ज्योत पुन्हा एकदा प्रज्वलित करायची असल्याचे सांगत मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे खासदार नवनीत राणा यांनी गेल्यावर्षी जाहीर केले. त्यावरून कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी त्यांना अटक केली होती. तेव्हापासून खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.

- Advertisement -

त्यातच खासदार नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्रावरूनही वाद सुरू आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्ज देताना दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीसंदर्भांत दिलेले प्रमाणपत्र हे बोगस आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता जातप्रमाणपत्राप्रमाणेच त्यांच्या जन्मतारखेबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

वाढदिवसानिमित्त हनुमान चालिसा पठण

श्री हनुमान‎ जयंती आणि खासदार नवनीत राणा यांच्या‎ वाढदिवसानिमित्त बडनेरा मार्गावरील वीर हनुमानजी खंडेलवाल लॉन येथे आज (6 एप्रिल) सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी नवनीत राणासह आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. यासंदर्भात रवी राणा यांनी ट्वीट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -