घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal : मी गृहमंत्री असताना धमक्यांचे प्रकार थांबवले होते, भुजबळांचा इशारा...

Chhagan Bhujbal : मी गृहमंत्री असताना धमक्यांचे प्रकार थांबवले होते, भुजबळांचा इशारा कोणाकडे?

Subscribe

नाशिक : ओबीसी नेते आणि राज्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळांकडून देखील या पत्राबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. भुजबळांच्या नाशिक येथील कार्यालयात हे धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात भुजबळांना जीवे मारण्याच्या धमकीचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. पण या मुद्द्यावरून आता छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर त्यांनी गुन्हेगारी संदर्भात केलेले वक्तव्य हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला असल्याचे म्हटले जात आहे. (When I was the Home Minister I stopped the threats, Chhagan Bhujbal)

हेही वाचा… Uddhav Thackeray : ‘राज्यपालांकडून आम्हाला अपेक्षा नाही; सरकार हटवा राष्ट्रपती राजवट लागू करा’

- Advertisement -

प्रसार माध्यमांना धमकीच्या पत्राबाबत माहिती देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक येथील त्यांच्या कार्यालयात हे धमकीचे पत्र आलेले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची सुपारी मारेकऱ्यांनी घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय, त्यांना ठार करण्याचा कट रचण्यासाठी कुठल्या हॉटेलसमोर बैठक झाली. त्यातील गाड्यांचे क्रमांक काय आहेत वगैरे अशी माहिती देण्यात या पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आयुष्यात मला अशी खूप धमकीची पत्र आली. तसे प्रयत्नही झाले. पण आपण हे सगळे पोलिसांवर सोडून द्यायच, असे त्यांनी सांगितले.

तर, या धमक्यांमुळे आपण आता घरात बसू शकत नाही. आपण घेतलेली भूमिकाही बदलू शकत नाही. जे काही परिणाम व्हायचे ते होतील. आपण पोलिसांना याची सगळी माहिती पुरवलेली आहे. पोलीस या सगळ्याचा शोध घेतील. महाराष्ट्रात अलिकडे जे प्रकार महाराष्ट्रात घडतायत, ते पाहाता आमच्या लोकांनी ताबडतोब ते पोलिसांना कळवले आहे. मोबाईल नंबर, गाड्यांचे नंबर अस सगळ आहे त्यात. कुठे बैठक झाली, कुणाचा मोबाईल नंबर अशी बरीच माहिती पत्रात आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

यावेळी त्यांनी गुन्हेगारीबाबत बोलताना म्हटले की, पूर्वी सुपाऱ्या घेऊन होत असलेले गँगवॉर आपण गृहमंत्री असताना आटोक्यात आले होते, असे म्हणत भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला मानला जात आहे. हे धक्कादायक आहे हे खरंच आहे. पूर्वी सुपाऱ्या घेऊन गँगवॉर व्हायचे. मी गृहमंत्री असताना ते आटोक्यात आले होते. पण आता ठीक आहे. जे आहे ते आहे. पोलीस त्यावर नक्कीच कारवाई करतील. ही धमकी नेमकी कशासाठी दिली, हे त्यांना पकडल्यानंतर लक्षात येईल. अशा कितीही धमक्या आल्या, प्रत्यक्षात त्या धमक्या अंमलात जरी आल्या, तरी मी माझी विचारसरणी सोडू शकत नाही, असे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -