घरमहाराष्ट्रनागपूरआम्ही दिल्लीत गेल्यावर 'कठपुतली' म्हणणाऱ्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही...; एकनाथ शिंदे कडाडले

आम्ही दिल्लीत गेल्यावर ‘कठपुतली’ म्हणणाऱ्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही…; एकनाथ शिंदे कडाडले

Subscribe

नागपूर : हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, पण त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांनी वातावरण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. दिल्लीत गेल्यावर आम्हाला कटपुतली म्हणतात, मात्र यांना नाक खाजवायला मॅडमची परवानगी घ्यावी लागते, असा टोला त्यांनी लगावला आहे. (When we went to Delhi the so called puppets could not even scratch their noses without Madam permission Eknath Shinde)

हेही वाचा – Devendra Fadnavis : विरोधी पक्षाने झोपेत पत्र लिहिलं का? विदर्भ, मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेख नाही

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही दिल्लीत गेलो की म्हणतात, यांचा स्वाभिमान हरवला आहे, कठपुतली आहेत. परंतु ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही खाजवता येत नाही, त्यांनी आमच्यावर आरोप आणि स्वाभिमानाची भाषा करु नये. कारण आम्ही दिल्लीत जातो आणि निधी आणतो. मात्र मागील अडीच वर्षात अहंकारामुळेच राज्याचं नुकसान झालं आहे. यांनी अहंकारामुळे अनेक प्रकल्प बंद पाडले. परंतु आमचं सरकार आल्यानंतर मेट्रो, आरे, समृद्धी सगळे प्रकल्प मार्गी लागले. विकासाच्या बाता त्यांनी मारु नयेत, असा टोला लगावताना एकनाथ शिंदे म्हणाले की, तीन राज्यातील निकालांनी यांचं सत्ता काबीज करण्याचं स्वप्न साफ केलं आहे. सत्ता काबीज करण्याचे यांचे दोर कापले गेले आहेत. ते कठपुतली आणि इतर गोष्टी बोलत आहेत. मात्र आमच्या दोऱ्या लोकांच्या हातात आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षण देण्याचं काम सरकार करेल

आम्ही आरक्षणाबाबत सुरुवातीपासून भूमिका घेतली आहे की, मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आणि इतर समजावर अन्याय होणार नाही, कुणाचंही आरक्षण कमी केलं जाणार नाही. ही भूमिका आमची स्पष्ट आहे. मुंबईत दसरा मेळाव्यात शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी तसं सांगितलं आहे. आमच्या सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. आम्ही ओबीसी समाजासोबत बैठक घेतली आहे. त्यांनाही सांगितलं आहे की, ओबीसी आरक्षणाबाबत चिंता करु नका. कुणबी समाजाच्या नोदींचा विषय आहे आणि त्यावर शिंदे कमिटी काम करत आहे. ज्या जुन्या नोंदी आहेत, रक्ताची नाती आहेत, याबाबत नोंदी सुरु आहेत. मराठा आरक्षण देण्याचं काम सरकार करेल. सर्व विरोधी पक्षांची आम्ही बैठक घेतली. सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं की, मराठा समजाला टिकणारं आरक्षण सरकार देणार आहे. मराठा समाजाने आमच्यावर विश्वास ठेवावा, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलं.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : सत्ताधाऱ्यांचे मुंबईबाबतच्या चर्चेचे ठाकरे गटाने स्वीकारले आव्हान; ऐन थंडीत कोणाला फुटणार घाम?

विरोधकांना शेतकऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

विदर्भात अधिवेशन असताना विदर्भाच्या प्रश्नांना महत्त्व दिलं पाहिजे. विदर्भाशी आमचं एक नातं आहे. त्यामुळे लोकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प पूर्ण केले जातील, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं. यावेळी ते असेही म्हणाले की, आम्ही 10 हजार कोटीपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार यांना नाही. जे कधी घराबाहेर पडले नाहीत, ते शेतकऱ्यांच्या बांधावर जायच्या बाता करतात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -