घरमहाराष्ट्रसंघाच्या कार्यकारणीवर सर्व वर्ण, जातींना स्थान कधी मिळेल? सचिन सावंतांचा सरसंघचालकांना सवाल

संघाच्या कार्यकारणीवर सर्व वर्ण, जातींना स्थान कधी मिळेल? सचिन सावंतांचा सरसंघचालकांना सवाल

Subscribe

मुंबई : नाव, पात्रता आणि सन्मान काहीही असले तरी सर्व समान आहेत आणि त्यात काहीही फरक नाही, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेसाठी पंडितांना जबाबदार धरले आहे. यावर काँग्रेसने टीका केली आहे. संघाच्या कार्यकारी मंडळात आता सर्व वर्ण व जातींना स्थान कधी मिळेल? हे जाहीर करावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी दिले आहे.

मुंबईत संत रोहिदास जयंती सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेबाबत भाष्य केले. माझ्यासाठी सर्वजण एक आहेत, त्यांच्यात जात-वर्ण नाही, पण पंडितांनी श्रेणी निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक काम समाजासाठी असते, तर कोणी उच्च, कोणी नीच किंवा कोणी वेगळे कसे होऊ शकतात? केवळ स्वत:चाच विचार करणे आणि आपलीच उपजीविका करणे एवढाच धर्म नाही. समाजाप्रती देखील आपली जबाबदारी आहेच. सत्य हेच ईश्वर आहे… नाव, योग्यता आणि सन्मान काहीही असले तरी सर्व समान आहेत आणि त्यात काहीही फरक नाही आपलेपणा सर्वांविषयी आहे… काही पंडित धर्मग्रंथांच्या आधारे जे म्हणतात ते खोटे आहे…, असेही सरसंघचालक म्हणाले होते.

- Advertisement -

जाती-जातीच्या श्रेष्ठतेच्या कल्पनेमध्ये तसेच उच्च-नीचतेच्या भोवऱ्यात अडकून आपण भ्रमिष्ट झालो आहोत. याला अन्य कोणी जबाबदार नाही. आपल्याला हा भ्रम दूर करायचा आहे. समाजातील आत्मीयता संपते, तेव्हा स्वार्थ मोठा होतो, असे मोहन भागवत यांनी सांगितले होते.

- Advertisement -

यावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. आता मोहन भागवत यांनी, संघाच्या कार्यकारी मंडळात आता सर्व वर्ण व जातींना स्थान कधी मिळेल? हे जाहीर करावे. तसेच संघाच्या स्थापनेपासून आजवर विशिष्ट वर्गातील लोकांनाच संघाच्या कार्यकारिणीत स्थान का मिळत आहे? हे ही स्पष्ट करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -