घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी? आशिष शेलार म्हणाले, काम अंतिम टप्प्यात...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी? आशिष शेलार म्हणाले, काम अंतिम टप्प्यात…

Subscribe

Status Of Classical Language for Marathi | आमच्या काळात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडली असून सर्वपक्षीयांनी एकत्र आल्यास भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यावर आमदार आशिष शेलार यांनी छगन भुजबळ यांना आश्वासन देत लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असं म्हटलं.

Status Of Classical Language for Marathi | मुंबई – ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी आज जगभर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. आजपासूनच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. यानिमित्ताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा मुद्दा माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विधानसभेत मांडण्यात आला. आमच्या काळात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडली असून सर्वपक्षीयांनी एकत्र आल्यास भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यावर आमदार आशिष शेलार यांनी छगन भुजबळ यांना आश्वासन देत लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असं म्हटलं.

सभागृहातील नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सर्वांनी एकत्रित दिल्लीत जाऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून घेतला पाहिजे. अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकष साहित्य अकादमीने मान्य केले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मराठी भाषेला अत्युच्च असा अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून गळ घातली पाहिजे. सगळ्यांनीच मिळून पुढाकार घेतल्याशिवाय हे होऊ शकणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. तसंच, दक्षिण भारतात सात भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास साडेचारशे विद्यापीठात मराठी शिकवली जाईल, याकडेही भुजबळांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

त्यांच्या या मागणीला उत्तर देताना आशिष शेलार यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे. “आज मराठी भाषा गौरव दिन आहे. आज कुसुमाग्रजांची जयंतीही आपण साजरी करतो. भारताबाहेरही हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने जगभरात भावना सारखी आहे. मराठी भाषा बोलीभाषेपुरती मर्यादित न राहता ज्ञानभाषा आणि अभिजात भाषेचा दर्जा व्हावा याकरता आमचं १०० टक्के समर्थन आहे,” असं आशिष शेलार म्हणाले.

“दिल्लीतील असलेल्या बाबूंकडे काही गोष्टी परखडपणे मांडल्या आहेत. २०१७-१८ मध्ये तत्कालीन मंत्र्यांना भेटून या प्रकरणी केंद्राने गती देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टीत अंतिम टप्पा गाठायचा आहे. विधानसभेतील सदस्य, पक्ष, आमदार, मंत्री, मान्य न मिळालेले पक्ष असे सगळे मिळून एकत्र दिल्लीत गेलो पाहिजे, असं आशिष शेलार म्हणाले. तसंच, हे अधिवेशन संपल्यानंतर मार्च महिन्यात किंवा शक्य न झाल्यास एप्रिल महिन्यात कोणतीही विदेशी ट्रीप होण्याआधी सर्वांनी दिल्लीत जाऊन अभिजात भाषेसाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती आशिष शेलार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी केली.

- Advertisement -

तसंच, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सभागृहात दिलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -