घरताज्या घडामोडीअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा कधी होणार? सर्व माहिती एका क्लिकवर

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा कधी होणार? सर्व माहिती एका क्लिकवर

Subscribe

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याकरता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत ३.०६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याकरता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै रोजी होईल तर इयत्ता दहावीची परीक्षा २७ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. MSBSHSE पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (When will the supplementary examination of failed students be held? All information on one click)

हेही वाचा –Maharashtra SSC Result 2022 : यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के, कोकण विभाग अव्वल तर नाशिक सर्वात मागे

- Advertisement -

२१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. तर, इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच, पुरवणी परीक्षेसाठी बारावीचे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली असून दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २० जूनपासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात होईल, अशी माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दहावीच्या परीक्षेसाठी ९ विभागातून १५ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधून १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच, एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण जाले. तर, उर्वरित ३.०६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

- Advertisement -

१२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

दोन वर्षांनंतर यंदा दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. शिक्षण ऑनलाईन तर परीक्षा ऑफलाईन झाल्याने त्याचा परिणाम निकालावर लागण्याची शक्यता होती. मात्र, यंदाही विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत. राज्यातील १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर, ८३ हजार ६० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत.

राज्यातील २२,९२१ माध्यमिक शाळांतून १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२,२१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६,५०,७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत ५,७०,०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत २,५८,०२७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत ४२,१७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांचीही बाजी

या परीक्षेस राज्यातील नऊ मंडळामधून एकूण ८१६९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८०२९ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.40 आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 54,159 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 52,351 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 41,390 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 79.06 आहे.

दहावीचा विभागवार निका

१) पुणे 96.96

२) नागपूर 97.00

३) औरंगाबाद 96.33

४) मुंबई 96.94

५) कोल्हापूर 98.50

६) अमरावती 96.81

७) नाशिक 95.90

९) लातूर 97.27

१०) कोकण 99.27

उत्तर पत्रिकांचे पुनर्मूल्यांकन कसे करायचे? 

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार असून यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर सर्व माहिती अटी / शर्ती व सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठीचे विहित शुल्क Debit Card/Credit Card/ UPI / Net Banking याद्वारे ऑनलाईन पध्दतीनेच भरावे लागणार आहे.

गुण पडताळणीसाठी सोमवार २० जून २९ जून २०२२ पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. या  गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु.५०/- इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.

मार्च एप्रिल २०२२ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी १) ई-मेलद्वारे / संकेतस्थळावरुन २) हस्तपोहोच ३) रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल व त्यांनी मागणी केलेल्या पध्दतीने छायाप्रत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे २० जून ते ९ जूलैपर्यंत विहित नमुन्यात उपरोक्त वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागेल. उत्तरपत्रिकेच्या प्रिंटसाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -