घरदेश-विदेशसरासरी 80 वर्षांच्या आयुष्यात आपण सर्वाधिक वेळ कुठे घालवतो? धक्कादायक आकडेवारी आली...

सरासरी 80 वर्षांच्या आयुष्यात आपण सर्वाधिक वेळ कुठे घालवतो? धक्कादायक आकडेवारी आली समोर

Subscribe

मुंबई : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुले हृदयरोग, उच्चरक्तदाब यासारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात कोण किती वर्ष जगेल हे सांगता येत नाही. मात्र, आपण जिवंत असेपर्यंत आपले काम आणि समाजातील आपल्या योगदानावरून ओळखले जातो. पण हे सर्व कार्य करत असताना आपला इतरही अनेक गोष्टींमध्ये वेळ जात असतो. सरासरी 80 वर्षांच्या आयुष्यात आपण किती वेळ कोणकोणत्या गोष्टींमध्ये घालवतो हे आपल्याला कळत नाही. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या एका सर्वेक्षणानुसार आपले अर्धे आयुष्य झोपणे, काम, टीव्ही पाहणे आणि शॉपिंगमध्ये जात असल्याची धक्कादाक आकडेवारी समोर आली आहे. (Where do we spend the most time in an average 80 year old life Shocking statistics came out)

हेही वाचा – मुलाचे नाव ठेवण्यावरून पती-पत्नी जाम भांडले अन् कोर्टानेच केलं बाळाचं बारसं

- Advertisement -

26 वर्ष आपण झोपतो

सरासरी 80 वर्षांच्या आयुष्यात आपण तब्बल 26 वर्ष फक्त झोपतो. यानंतर आपण आयुष्यातील 12 वर्ष काम करतो. खाणे-पिणे करण्यासाठी 3 महिने 6 वर्ष, घरकाम करण्यासाठी 1 वर्ष 2 महिने आणि व्यायाम करण्यासाठी 1 वर्ष 2 महिने एवढा वेळ आपण घालवतो. ओटीटीमुळे सध्या तरुणाईचा टीव्ही पाहण्याचा कालावधी येणाऱ्या कालत घटणार आहे. परंतु सध्या आपला टीव्ही पाहण्यासाठी 8 वर्ष 8 महिने एवढा वेळ जातो.

सोशल मीडियासाठी आपला 3 वर्ष एवढा वेळ जातो

बदलत्या जीवनशैलीनुसार सध्याची तरुण पिढी मोबाइलवर जास्त वेळ घालवताना दिसते. आपण 8 वर्ष 5 महिने एवढा सर्वाधिक वेळ फक्त खरेदी करण्यासाठी जातो. इंटरनेटवर आपण 3 वर्ष 2 महिने, सोशल मीडियावर 3 वर्ष, मित्रांच्या भेटीगाठी 2 वर्षे, नट्टापट्टा करण्यासाठी 1 वर्ष 5 महिने, पब व रेस्टॉरंट 1 वर्ष, ऑनलाइन पॉर्न 300 दिवस आणि शारीरिक संबंधासाठी 117 दिवस एवढा वेळ जातो.

- Advertisement -

हेही वाचा – एलियंस असल्याचा NASA ने केला दावा; कुठे आहेत Aliens? वाचा-

शौचालयात 240 दिवस एवढा वेळ जातो

आयुष्य जगताना हसणे-रडणे होतच असते. आपले 240 दिवस हे हसण्यात जातात, तर आपण 30 तास रडतो. प्रवास करण्यासाठी आपला 1 वर्ष 5 महिने एवढा वेळ जातो, परंतु  ट्रॅफिक जाममध्ये आपले 60 दिवस जातात. शौचालयात आपण 240 दिवस घालवतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -