घरताज्या घडामोडीमलिक आणि देशमुख आता कोणत्या कोर्टात जाणार? सोमय्यांचा खोचक सवाल

मलिक आणि देशमुख आता कोणत्या कोर्टात जाणार? सोमय्यांचा खोचक सवाल

Subscribe

मलिक आणि देशमुख आता कोणत्या कोर्टात जाणार असं विचारत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ते बोलत होते.

विधान परीषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना कोर्टाने परवानगी नाकारली आहे. यावर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खोचक सवाल केला आहे. मलिक आणि देशमुख आता कोणत्या कोर्टात जाणार असं विचारत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ते बोलत होते. (Which court will Malik and Deshmukh go to now? Somaiya’s question)

हेही वाचा – मोठी बातमी! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी नाकारली

- Advertisement -

नवाब मलिक आणि अनिश देशमुख यांना मतदानासाठी परवानगी नाकारल्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच, मलिक आणि देशमुख आता कोणत्या कोर्टात जाणार असा सवालही त्यांनी विचारला. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं.

सोमय्या म्हणाले की, शिवसेनेला भिती वाटतेय आणि काँग्रेसला काळजी वाटतेय की त्यांचे आमदारच त्यांना मतदान करणार नाहीत. आमदार फुटले तर विधान परिषदही हातातून जाईल. विधान परिषदेत जर काही गोंधळ झाला तर मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाईल अशीही भिती त्यांना वाटत आहे, असंही सोमय्या म्हणाल.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा परवानगीसाठीचा अर्ज फेटाळून लावला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीनंही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानाला विरोध केला होता. कुठल्याही कैद्याला मतदानाचा अधिकार देता येत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या कैदेत असता तेव्हा तुमच्यावर निर्बंध असतात. तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांसारखे अधिकार राहत नाहीत, असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला होता. त्यानंतर उच्च न्यायालयानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळत त्यांना परवानगी नाकारलीय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -