घरट्रेंडिंगखरी शिवसेना कोणाची?, मनसेचा उद्धव ठाकरेंना सवाल

खरी शिवसेना कोणाची?, मनसेचा उद्धव ठाकरेंना सवाल

Subscribe

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी युती करत राज्यात नवे सरकार स्थापन केले आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी (BJP) युती करत राज्यात नवे सरकार स्थापन केले आहे. मात्र शिवसेना आणि भाजपा या युती सरकारच्या स्थापनेनंतर खरी शिवसेना कुणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही हा सवाल विचारत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. (which is original shiv sena mns Sandeep Deshpande question to uddhav thackeray)

संदिप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना सवाल विचारला आहे. “खरी शिवसेना कोणाची?चाळीस च्या आसपास असण्याऱ्या शिंदेंची की मा.बाळासाहेबांच्या आग्रहाखातर राजसाहेबांनी प्रस्ताव मांडून कार्यध्यक्ष बनवलेल्या उद्धव साहेबांची· हा तर प्रश्न कदाचित कोर्टात सोडवला जाईल पण महत्वाचा प्रश्न हा आहे “शिवसैनिक”या पदाची व्याख्या काय जो बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन काम करतोय की ज्याने हिंदुत्व सत्तेसाठी सोडलंय तो? याचा निर्णय अर्थात शिवसैनिकांनीच घ्यायचाय”, असे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

याशिवाय एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “४० आमदार ज्यांच्यासोबत आहे ती खरी शिवसेना?, की राज ठाकरे यांनी महाबळेश्वरच्या अधिवेशनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्राहाखातर कार्यध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव सुचवले होते. त्यांची शिवसेना खरी?, असा सवाल उपस्थित करत या प्रश्नाचे उत्तर न्यायालयात सोडवले जाऊ शकते”, असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले.

पण शिवसैनिक कोण?, या पदाची व्याख्या करण्याची वेळ आता शिवसेनेवर आली आहे. कारण बाळासाहेबांचे हिंदूत्वाचे विचार पुढे घेऊन जात आहे तो खरा शिवसैनिक की, ज्यांनी हे विचार सोडले आहेत ते खरे शिवसैनिक?, असेही सवाल विचारत देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना दिलासा, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -