घरCORONA UPDATEकोरोना व्हायरस : पॉर्न इंडस्ट्रीच्या स्टार्सना घरामध्येच आयसोलेट

कोरोना व्हायरस : पॉर्न इंडस्ट्रीच्या स्टार्सना घरामध्येच आयसोलेट

Subscribe

जगातील सर्वात मोठी पॉर्न इंडस्ट्रीचा हब उत्तर अमेरिका येथे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर अमेरिकेतील इंडस्ट्रीमध्ये चित्रीकरण थांबविण्यात आले आहे.

जगातील सर्वात मोठी पॉर्न इंडस्ट्रीचा हब उत्तर अमेरिका येथे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर अमेरिकेतील इंडस्ट्रीमध्ये चित्रीकरण थांबविण्यात आले आहे. करोनामुळे जगभरातील हाहाकार उडाला असून करोनाची लागण झालेल्यांच्या संख्येमध्ये अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यामुळे पॉर्न इंडस्ट्रीची संघटना द फ्री स्पीच कोएलिशनने इंडस्ट्रीला ३१ मार्च पर्यंत टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आता पॉर्न स्टार्सनी घरामध्येच राहण्याची एक मोठी अटही घातली आहे .

अमेरिकेतील आणि कॅनडामधील सर्व १८+ मनोरंजनाचे चित्रीकरण करण्यास स्वेच्छेने बंद करण्यात आले असून हि बंदी पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे. गेल्या काही दिवसापासून असे समजत होते की पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या स्टार्सना करोनाची आढळल्याने त्यांना घरामध्येच आयसोलेट करण्यात आले आहे. या लोकांना तपासण्याची आवश्यक सामुग्री नसल्याने त्यांना करोना पॉझिटिव्ह समजण्यात येत आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

- Advertisement -

चित्रीकरणादरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास करोनाचा फैलाव पसरण्याची भीती आहे. यामुळे नवीन चित्रिकरण न करता जुने केलेले चित्रीकरण असेल तर ते प्रसिद्ध करू शकतात. मात्र, या स्टार्सनी घरातील व्यक्ती व्यतिरिक्त अन्य बाहेरच्या व्यक्तीसोबत अडल्ट कंटेंट बनविण्यास बंदी आणण्यात आली आहे.

इंडट्रीतील सेट स्वच्छ असतात. यामुळे कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे. परंतु शारीरिक संबंध आल्यानंतर कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे.
– माईक स्टेबिक, अध्यक्ष, द फ्री स्पीच कोएलिशन इंडस्ट्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -