घरमहाराष्ट्रनागपूरहोम ग्राऊंडमध्ये कोण देतयं उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज, देवेंद्र फडणवीस नागपूरमधील चार मतदारसंघांच्या दौऱ्यावर

होम ग्राऊंडमध्ये कोण देतयं उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज, देवेंद्र फडणवीस नागपूरमधील चार मतदारसंघांच्या दौऱ्यावर

Subscribe

कर्नाटकातील काँग्रेसच्या दिग्विजयचा झटका महाराष्ट्रात बसू शकतो का? याचा राजकीय पंडित अजून कयासच लावत आहे. तर केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं बदलत्या वाऱ्याचा अंदाज घेतलेला दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांत विधानसभेच्या चार मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. कर्नाटकातील पराभवानंतर भाजप खडबडून जागी झाली असून ग्रासरुटवर त्यांनी फोकस केल्याचे दिसत आहे. त्यामुळेच फडणवीस हे तालुका आणि नगर पालिकांतही तळ ठोकणार असल्याचं सांगत आहेत. (who challenges Deputy Chief Minister Devendra Fadnavis on home ground)

कर्नाटकातील काँग्रेसच्या दिग्विजयचा झटका महाराष्ट्रात बसू शकतो का? याचा राजकीय पंडित अजून कयासच लावत आहे. तर केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं बदलत्या वाऱ्याचा अंदाज घेतलेला दिसत आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूर हे फडणवीसांचं होम ग्राऊंड आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय. असं असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील विधानसभेचा प्रत्येक मतदारसंघ आणि तालुका पिंजून काढणार असल्याचं म्हणत आहेत. त्याची सुरुवात फडणवीसांनी शुक्रवारी सकाळपासून केली आहे. दोन दिवसांमध्ये ते चार मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. उर्वरित दोन मतदारसंघात पुढील आठवड्यात येईल असं त्यांनी आजच सांगून टाकले आहे. फडणवीस पहिल्या टप्प्यात दौरा करणारे हे सर्व नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण मतदारसंघ आहेत. नागपूर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ, त्यातील सहा शहरी तर सहा ग्रामीण आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आज सावनेर आणि काटोल मतदारसंघाचा दौरा केला आहे. सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार तर काटोल हा माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला आहे. उमरेड मतदारसंघातून काँग्रेसचे राजू पारवे आमदार आहेत. तर उर्वरित हिंगणा, कामठी भाजपच्या ताब्यात. येथे अनुक्रमे समीर मोघे आणि टेकचंद सावरकर आमदार आहेत. रामटेकमधून अपक्ष आशिष जैस्वाल आमदार आहेत, ते सध्या शिंदे गटाशी जोडलेले आहे. नागपूर ग्रामीण मधील सहा पैकी फक्त दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत. या सर्व मतदारसंघावर फडणवीसांनी लक्ष्य केंद्रीत केलं आहे. पण अचानकच उपमुख्यमंत्री आपल्या होमग्राऊंडवर का उतरले? हा सध्या सर्वांना पडलेला प्रश्न आहे.

- Advertisement -

विधानसभा मतदारसंघ, तालुका, नगरपालिका पिंजून काढणारे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस काही एकटे नाहीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे परवाच मुंबईत येऊन गेले. त्यांनी घाटकोपर, चारकोप, चेंबूर, कांदिवली असा वॉर्डावॉर्डांचा दौरा केला. बुद्धीवंतांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एवढचं नाही तर, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एका कार्यकर्त्याच्या घरी ‘सहभोजन’ देखील केले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी हे सुरु आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या वर्षाच्या शेवटी मुंबई महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष वार्डा-वार्डात फिरत आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा हे जमीनीवर उतरण्याचे दुसरं कारण आहे, कर्नाटक निवडणुकीचा निकाल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानं काँग्रेसच्या पंखात जेवढं बळ निर्माण केलं नसेल, त्याच्या कितीतर पट अधिक धावपळ, भाजप नेत्यांची सुरु झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई, पुण्यात तर उपमुख्यमंत्री नागपूरमध्ये पोहचले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपला विदर्भात मोठा झटका बसला आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र येत नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपला बालेकिल्ल्यात धुळ चारली होती. भाजपची हिच स्थिती अमरावती पदवीधर मतदार संघातही झाली होती. त्याआधी नागपूर पदवीधर निवडणुकीतही काँग्रेसनं फडणवीसांना जोरदार झटका दिला होता. तिन्ही पक्ष एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे फडणवीसांनी नागपूरमध्ये अनुभवलेलं आहे.

सुशिक्षित मतदारांकडून पोळलेल्या भाजपने आता ताकही फुंकून पिण्याचं ठरवलेलं दिसत आहे. त्यातच आता कर्नाटकी झटकाही जोरदार बसला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे उद्धव ठाकरेंना मिळत असलेली सहानुभूतीही भाजप नेत्यांच्या या दौऱ्या पाठीमागचे एक कारण आहे. नागपूर दौऱ्यात फडणवीस, सरकारच्या योजना परिणामकारकरित्या सामान्यांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगत आहेत. पण त्यांची सर्वाधिक ऊर्जा खर्च होत आहे ती, निकाल कसा आमच्याच बाजूने लागला, हे सांगण्यात. आणि ठाकरेंच्या पोपटावर बोलण्यात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बालेकिल्ल्यातील निम्म्या जागा कायम राखण्यासाठी आता मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे, असंच दिसत आहे. पुढील आठवड्यात फडणवीस नागपूर ग्रामीण मधील उर्वरीत दोन मतदारसंघांचा दौरा करतील. त्यानंतर नागपूर शहरी मतदार संघावर ते लक्ष्य केंद्रीत करण्याची शक्यता आहे.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -