छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाहीत, संभाजीराजेंच्या प्रश्नावर राऊत संतापले

देशभरात महाराणा प्रतापाचे वंशजही एखाद्या पक्षात आहेत. मग जयपूरचं राजघराणं असेल, प्रत्येकाचे कुठेना कुठे तरी राजकीय लागेबांधे आहेत. राजकीय विचार घेऊनच पुढे जायचं असतं. इथे व्यक्तिगत काही नसतं. आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी स्वीकारली नाही. ठीक आहे, आमच्यासाठी विषय संपला, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

shiv sena sanjay raut not appear ed money laundering case

कोल्हापूरः छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाही आहेत. संपूर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत ते, शिवेंद्रराजेंनी किती पक्ष बदलले, ते अपक्ष आहेत का?, पक्षाचं वावडं आहे का नाही ना?, त्यांच्या घराण्यामध्ये कोणी किती वेळा पक्ष बदलले. कोणकोणत्या पक्षात गेले. कशाला तोंड उघडायला लावताय. आम्हाला त्या गादीविषयी आदर आहे. तो तसाच राहील, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी संभाजीराजेंच्या प्रश्नावर उत्तर दिलंय. संजय राऊत आज शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापुरात होते, त्यावेळी ते बोलत होते.

तुम्हाला राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्ही कोणीही असाल तरी राजे, महाराजे, संस्थानिक, त्यांना कोणत्या तरी पक्षाचा हात धरावाच लागतो. देशभरात अशी अनेक उदाहरणे आहेत, महाराणा प्रतापांचे वंशजही एखाद्या पक्षात आहेत. मग जयपूरचं राजघराणं असेल, प्रत्येकाचे कुठेना कुठे तरी राजकीय लागेबांधे आहेत. राजकीय विचार घेऊनच पुढे जायचं असतं. इथे व्यक्तिगत काही नसतं. आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी स्वीकारली नाही. ठीक आहे, आमच्यासाठी विषय संपला, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

त्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नसल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर प्रश्न विचारला असता, ते म्हणाले चंद्रकांतदादा पाटलांनी 2019ला मोडलेल्या शब्दाचा खुलासा करावा. शब्द मोडण्याची परंपरा कोणाची आहे. फसवणारे कोण आहेत. 2019 साली शब्द कोणी दिला होता. कोणी मोडला. शिवसेना कधीही शब्द मोडत नाही. याच्यावरती आम्ही आता शक्यतो बोलायचं टाळतो. छत्रपती संभाजीराजे आणि आमच्यातला विषय आहे. इतरांनी मध्ये चोमडेपणा करू नये, असंही ते म्हणालेत. तसेच या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा संबंध काय आहे. तो शिवसेनेचा प्रश्न आहे, एवढीच चिंता असेल तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना 42 मते द्यावीत. फडणवीस आमच्या पक्षात येतायत का?, असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीसांवरही पलटवार केलाय.

मी कोल्हापुरात आलोय, शिवसंपर्क मोहिमेसाठी आलोय. संपूर्ण महाराष्ट्रात दोन टप्प्यांत ही मोहीम सुरू होतेय, हा दुसरा टप्पा सुरू आहे, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर थोडं हॉट झालेलं आहे. त्याच्यामुळे मुंबईतूनही पत्रकार इथे पोहोचलेले आहेत. तसा रोज सकाळी मी बोलतो पत्रकारांशी, मुंबईला, जिथे असेन तिथे, आज कोल्हापूरची वेळ आहे. माझा कोल्हापूरचा दौरा हा संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक, महानगरपालिका निवडणूक त्यासंदर्भात पक्षाची बांधणी करणं, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावे घेणं, पक्षप्रमुखांच्या ज्या सूचना आहेत, यासंदर्भात त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं, 2023 साठी तयार राहणं, त्या लढाईसाठी पक्ष आणि कार्यकर्ता तयार असला पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.


हेही वाचाः उद्धव ठाकरे खोटे बोलताहेत, संभाजीराजेंचा थेट आरोप