घरताज्या घडामोडीगेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले अनिल परब कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? जाणून...

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले अनिल परब कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? जाणून घ्या

Subscribe

अनिल परब यांच्यावरील आरोप कोणते

महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून कोणत्याही प्रकरणात आपली कायद्याची बाजू मांडून शिवसेनेच्या बाजून वक्तव्य करणारे परिवहन मंत्री अनिल परब सध्या खूप चर्चेचे विषय ठरत आहेत. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब हे शिवसेनेची कायद्याची बाजू मांडणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. शिवसेनेवर कोणी टीका केली की, त्यांना कायद्याच्या भाषेत अनिल परब प्रत्युत्तर देत असतात. सचिन वाझे प्रकरणामध्ये तसेच मनसूख हिरेन प्रकरणात विधानसभेत विरोधकांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीवर सामोरे जाऊन अनिल परब यांनी तोडीस तोड उत्तर दिले आहे. हेच अनिल परब कोण आहेत. त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

अनिल परब यांच्याकडे कोणते मंत्रीपद

अनिल परब सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री पदाचा कार्यभार पाहत आहेत. अनिल परब यांच्या मागे मोठा जनाधार नसतानाही त्यांच्यावर मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सत्तेत येत असताना आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी मोठे नाट्य आणि नाट्यमय घडामोडी रंगत होत्या. आमदार फुटू नये यासाठी सर्व विजयी आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. अनिल परब यांनाही हॉटेलध्ये ठेवण्यात आले होते. अनिल परब सर्व आमदारांची परिस्थिती सांभाळत होते. अनिल परब यांना दिलेली जबाबदारी ते नेहमी चोखपणे पार पाडत आले असल्यामुळे त्यांना राज्य सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -

२० वर्षांपासू शिवसेनेत कार्यरत

शिवसेनेची कायद्याची बाजू सांभाळणारे अनिल परब हे मागील २० वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. अनिल दत्तात्रय परब असे त्यांचे पूर्ण नाव असून अनिल परब यांनी आपले बीकॉमचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर एलएलबीचं (वकिली) शिक्षण पुर्ण केले आहे. अनिल परब यांनी वकिली करता नेहमी सामाजिक कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्तवाचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप अशा कार्यक्रमातून हळू हळू राजकारणात येऊल लागले. अनिल परब नंतर विद्यार्थी सेनेच्या आंदोलनात सक्रीय होऊ लागले. अनिल परब यांच्या पुढाकारामध्ये अनेक विद्यार्थी सेनेचे आंदोलने झाली. अनिल परब राजकारणात रुळू लागले यानंतर २००१ मध्ये अनिल परब यांच्यावर शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून जाबाबदारी देण्यात आली आहे.

अनिल परब यांनी २००१ पासून ते २००४ पर्यंत शिवसेनेत महत्त्वाच्या भूमिकांची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. अनिल परब यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना २००४ साली विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. यानंतर सलग २००४ ते १०१८ पर्यंत विधानपरिषदेतील कामकाज पाहत आले आहेत. २०१५ साली वांद्रे पश्चिममधील पोटनिवडणूकीमध्ये अनिल परब यांच्यावर निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. या पोटनिवडणूकीत शिवसेनेकडून तृप्ती सावंत उमेदवार होत्या तर काँग्रेसकडून नारायण राणे उमेदवार होते. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढाई सुरु झाली होती. परंतु अनिल परब यांना देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत शिवसेनेला विजय मिळवून दिला होता. या विजयानंतर अनिल परब यांच्यावर शिवसेनेत अनेक जबाबदाऱ्या पडू लागल्या त्या जबाबदाऱ्याही अनिल परब उत्तमरित्या पार पाडत होते.

- Advertisement -

पुढे २०१७ साली मुंबई महापालिकेची निवडणूक आली त्यावेळी भाजप आणि शिवसेनेत असलेल्या युतीत फुट पडली. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपतर्फे शिवसेनेवर करण्यात आला. परंतु या आरोपांना अनिल परब यांनी सडेतोड उत्तर दिले. शिवसेनेवर केलेल्या आरोपांना अनिल परब यांनी कायद्याच्या भाषेत उत्तर दिले होते. महापालिका निवडणूक शिवसेनेने पुन्हा जिंकून भ्रष्टाचाराचा मुद्दा खोटा ठरवला या सर्वात अनिल परब यांचे काम मात्र पुन्हा एकदा वठून समोर आले होते.

महाविकास आघाडीमध्ये परिवहिन मंत्रीपद

२०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार होते. परंतु मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर या दोन्ही पक्षात फारकत आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. यामध्ये खातेवाटप करताना अनिल परब यांच्या कामाची दखल घेत त्यांना परिवहन मंत्रीपदी नियुक्त करण्यात आले. यावेळी अनिल परब हे पहिल्यांदा मंत्री बनले. अनिल परब यांना मंत्री बनवल्याने शिवसेनेत दोन गट पडल्याचेही चित्र निर्माण झाले होते. तसेच पक्षात काही नाराज कार्यकर्त्यांची अंतर्गत धूसपूस बाहेर येत होते. अनिल परब यांच्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून अनिल परब यांना मंत्री बनवण्यात आले आहे.

सर्व विषयांवर शिवसेनेची बाजू मांडणे

शिवसेनेवर आरे मेट्रो कारशेड, कांजूर कारशेड, मराठा आरक्षण आणि आता सचिन वाझे प्रकरणामुळे अनेक वेळा आरोप करण्यात आले आहेत. यावर कायद्याची बाजू घेऊन विरोधकांना अनिल परब यांनी नेहमी गारद केले आहे. सचिन वाझे प्रकरण उफाळल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शिवसेनेवर आरोप केले होते. यावेळीही कायद्याची मदत घेत फडणवीसांच्या आरोपांना अनिल परब यांनी तोडीस तोड उत्तर दिले आहे. अनिल परब यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवरही भाष्य केले आहे. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी जमा करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. याविरोधातही अनिल परब यांनी आपले मत मांडले आहे.

अनिल परब यांच्यावरील आरोप कोणते

अंबानी स्फोटक प्रकरणात अटक केलेल्या सचिन वाझेंनी एनआयएच्या विशेष कोर्टात दिलेल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही आरोप केले आहेत. अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपात म्हटले आहे की, अनिल परब यांनी भेडी बाजार येथे सुरु असलेल्या भव्य क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून ५० कोटी रुपये वसूल करण्याची मागणी केली. अनिल परब यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावून खंडणी मागण्यास सांगितले असल्याचे सचिन वाझेंनी पत्रात म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -