घरमहाराष्ट्रसंजय राठोड यांची झोप उडवणाऱ्या चित्रा वाघ आहेत तरी कोण? जाणून घ्या...

संजय राठोड यांची झोप उडवणाऱ्या चित्रा वाघ आहेत तरी कोण? जाणून घ्या राजकीय कारकीर्द

Subscribe

राज्यात सध्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात वादंग निर्माण झाले आहेत. कारण या प्रकरणात राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव आलं आहे. संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात सर्वप्रथम कोणी घेतलं असेल तर त्या आहेत चित्रा वाघ. चित्रा वाघ सातत्याने संजय राठो यांच्या राजीनामा घ्या अशी मागणी करत आहेत. चित्रा वाघा या पूजा चव्हाण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. संजय राठोड आणि ठाकरे सरकारची झोप उडवणाऱ्या चित्रा वाघ या नेमक्या आहेत कोण? त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? जाणून घेऊया.

राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीमधून भाजप-सेना युतीमध्ये जाणाऱ्यांची रांग लागली होती. यामध्ये चित्रा वाघ या देखील होत्या. अखिल भारतीय सेनेतून राजकीय कारकीर्द सुरु करणाऱ्या चित्रा वाघ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये गेल्या. चित्रा वाघ यांचा राजीनामा आणि भाजप पक्षप्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातो.

- Advertisement -

चौकशीच्या ससेमिऱ्यापासून बचाव व्हावा म्हणून पक्षांतर?

चौकशीच्या ससेमिऱ्यापासून बचाव व्हावा म्हणून चित्रा वाघ यांनी पक्षांतर केल्याची चर्चा सुरु होती. कारण चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी त्यांच्या पतीची चौकशी होणार होती. या चौकशीच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शरद पवारांचा त्या दाव्याला दुजोरा

चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे चित्रा वाघ नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीचं राजकारण नाही. चित्रा वाघ या गटबाजीमुळे नाराज होऊन पक्ष सोडून गेल्या यामध्ये काहीच तथ्य नाही. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी चित्रा वाघ यांनी हा निर्णय घेतला असावा, असं शरद पवार म्हणाले होते.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -