कोरोना विषाणू कोण? हे जनता दाखवतेयं; ‘सामना’तील टीकेचा उदय सामंतांनी घेतला समाचार

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. जसे कोरोनाचे व्हेरियंट येतात तसचं हे राज्यातलं सरकार आलेलं आहे. त्यांना योग्य ती लस जनता देईल, असं अग्रलेखातून म्हटलंय आता यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. सामनातून लिहिल्यामुळे फार राजकीय परिणाम होतो असं नाही, सामनाच्या अग्रलेखाची दखल महाराष्ट्र घेत नाही, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तसचं यावेळी त्यांनी राऊतांवरही निशाणा साधला आहे.

Uday Samant on Samana Editorial
Uday Samant on Samana Editorial

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. जसे कोरोनाचे व्हेरियंट येतात तसचं हे राज्यातलं सरकार आलेलं आहे. त्यांना योग्य ती लस जनता देईल, असं अग्रलेखातून म्हटलंय आता यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. सामनातून लिहिल्यामुळे फार राजकीय परिणाम होतो असं नाही, सामनाच्या अग्रलेखाची दखल महाराष्ट्र घेत नाही, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तसचं यावेळी त्यांनी राऊतांवरही निशाणा साधला आहे. ( Who is corona virus This is shown by the public The rise of criticism in Samana was taken up by Uday Samant  )

त्यांनी सामनातून लिहित राहावं….

जसे कोरोनाचे व्हेरियंट येतात तसचं हे राज्यातलं सरकार आलेलं आहे. त्यावर जनता परिणामकारक लस देईल, अशी टीका सामनातून करण्यात आली होती. यावर आता मंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. सामंत म्हणाले की , दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या  पोटनिवडणुका झाल्या. त्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अनुक्रमे 1, 2 आणि 3 नंबरला होते. ठाकरे गटाचा नंबर सर्वात शेवटी होता. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखाचा परिणाम काय होतो?  हे निवडणुकीत समजलंच आहे. विषाणू कोण?  हे जनता दाखवत आहे, असंही सामंत यावेळी म्हणाले. कृषी उत्पादकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप कधीही नव्हतं तिथेही 43 टक्के जागा आमच्या आहेत. त्यामुळे त्यांनी सामनातून लिहित राहावं. महाराष्ट्र त्याची दखल घेत नाही आणि सामनातून लिहिल्यामुळे फार राजकीय परिणाम होतो असंही नाही, असं सामंत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेस यांची जी महाविकास आघाडी आहे ही येत्या निवडणुकीत जिंकणार नाही, याची मला खात्री आहे, असं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.

राऊतांवर साधला निशाणा 

संजय राऊत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही, असं म्हणाले होते, या केलेल्या टिकेवरही सामंत यांनी भाष्य केलं आहे. रोज सकाळी उठून असबंध बोललं की, त्याची चर्चा होते आणि आता ती त्यांची सवय झाली आहे.

पुढच्या दोन ते चार वर्षांत रत्नागिरी हे महाराष्ट्रातलं एक सुंदर शहर म्हणून तसचं पर्यटनाच्यादृष्टीने लोक हे शहर बघायला येतील इतके चांगले चांगले प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राबवत असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. कालच, 9 कोटी खर्च करुन कोकणातील अतिशय सुंदर अशा शिवसृष्टीचं उद्घाटन केलं आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीचं रुपडं पालटलेलं तुम्हाला दिसेलं असं उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

( हेही वाचा: जितेंद्र आव्हाडांच्या अडचणींत वाढ; पोलिसांनी दाखल केलं 500 पानी आरोपपत्र )